पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Thangalaan Movie Review | तंगलान मूव्ही रिव्यू | आंबेडकरवादी चित्रपट तंगलान | Pa Ranjit

इमेज
बाबासाहेब म्हणतात कि जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही.. बाबासाहेबांच्या याच उक्तिचा उलघडा करणारा चित्रपट म्हणजे तंगलान..! भारतीय चित्रपट क्षेत्राला काला, कबाली,सारपट्टा असे अनेक क्रांतीकारी चित्रपट देणाऱ्या पा.रंजित सरांचा हा नवा मूव्ही भारतात झालेली क्रांती प्रतिक्रांती डोळ्या समोर उभी करून.. आपले अस्तित्व विसरलेल्या लोकांना अस्तित्वाची ओळख करून देतो.. मूव्ही जरी केजीफ वर बनला असला तरी तो तूम्हाला बुद्ध काळा पर्यंत घेऊन जातो.. चित्रपटाचा नायक (हिरो) थंगलान हा नागवंशी मूलनिवासी असून त्याच्या पूर्वजांना यूध्दात हरवून अतिक्रमणकर्त्यानी या देशाच्या मूलनिवासी पिढ्यांन पिढ्यांचे कसे शोषण, अन्याय, अत्याचार करून त्यांना जल, जंगल, जमीन पासून वंचित केले, हालाखीचे जिवन जगण्यास भाग पाडले.. हा इतिहास चित्रपटातून मांडण्यात आला आहे.. पूढे जेव्हा हाजारो वर्षा नंतर जाती व्यवस्थेत खितपत पडण्या ऐवजी शौर्य दाखवून स्वाभिमान प्राप्त करण्याचा मोका थंगलान ला मिळतो, तेव्हा तो जिवाची परवा न करता आपल्या कुटूंबाच्या आणी आपल्या समाजाच्या उन्नती साठी सर्व काही करण्यास तयार होतो...