पोस्ट्स

शेतकऱ्यांची दिवाळी आणी एक लुप्त होत असलेली परंपरा |शेणाच्या गवळणी | ग्रामीण परंपरा | दिवाळी विशेष

इमेज
दिवाळी आणी शेणाच्या गवळणी - एक परंपरा..! आज काल दिवाळी म्हणजे मोती साबणाची आंघोळ, कैक प्रकारचा फराळ आणी आतिशबाजीने परिसर दणाणून सोडणे इतकचं तिच स्वरूप राहीलं आहे.. पण मूळ दिवाळी जी कृषी प्रधान परंपरेतून आली आहे तीचे एक वेगळचं स्वरूप होतं.. त्याला धर्माच्या गंधा पेक्षा लोकपरंपरेचा आणी नैसर्गिक इतिहासाचा मोठा वसा होता.. कारण दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण आहे. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात.. त्यातून समृध्द लोकजीवनाचे दर्शन घडतं.. आज मी तूम्हाला अशाच एका लूप्त होत चाललेल्या गोवळ्या / गवळणी या परंपरे विषयी सांगणार आहे.. महाराष्ट्रात दिवाळीच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणा मध्ये शेणा पासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वासुबारसेला गाई म्हशी ची ओवाळणी केली जात असे आणी दिवाळीची सूरूवात होत असे.. त्या नंतर धनत्रयोदशी च्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची.. ज्यात गाई च्या शेणा पासून ग्रामीण जन जीवन आणी ऐतिहासिक घटना क्रम साकारला जात असे.. अर्थातच घरातील ...

बाबासाहेबांची रमजान ईदची इफ्तारी एक थोतांड असत्य आणी आंबेडकरवादी बौद्धांचे इस्लाम प्रेम एक धोक्याची घंटा..! वाया म्यानमार - बांग्लादेश एक धावता आढावा

इमेज
विवेचन | आत्मपरीक्षण | चिकित्सा  आज काल प्रत्येक ईद ला काही आंबेडकरी भक्त कोणत्या ही गोष्टी ची सत्यता न जानून घेता वॉट्सएप यूनिवर्सिटी वर आलेले कॉपी पेस्ट ज्ञान वाचून असा दावा करतात की "बाबासाहेब अमुक तमूक लोकांन सोबत इफ्तार पार्टी ला गेले होते" पण सत्य तर हे असते की कधी त्यांनी ना बाबासाहेब वाचलेले असतात ना त्यांना आपला इतिहास माहित नसतो.. त्यांना तर फक्त दूसऱ्या धर्माची सण आपल्या स्वार्थी आनंदा पायी साजरी करण्यासाठी फक्त बाबासाहेबांचा आधार घ्यायचा खोट्या कथा इतिहासाच्या कूबड्या घ्यायच्या असतात..! असो आपण आज या वायरल मसेज मधील सत्य आणी पाहूया आणी आंबेडकरवादी बौद्धांचे इस्लामीक अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करू..! या दाव्या मध्ये पहिला फोटो जो मोठ्या प्रमाणात वायरल केला जात आहे, त्या मध्ये असे लिहले जाते की मौलाना आजाद यांनी रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टी ठेवली होती यानी त्यात बाबासाहेबांनी सहभाग घेतला होता.. पण वास्तविक पाहता.. हा फोटो ना रमजान च्या इफ्तार चा आहे  ना त्यात मौलाना आजाद आहेत.. तर हा फोटो 13 ऑक्टोंबर 1949 रोजी दिल्ली संसद भवन येथे एका अधिकृत सरकारी ...

Parbhani Violence | परभणी चे संविधान प्रकरण आणी संयम, स्व:नियंत्रण हरवलेला आंबेडकरी समाज | एक कडवट आत्मचिंतन आणी प्रशासकीय कारवाईचे परिक्षण

इमेज
★ भाग - एक :- कडवट पण सत्य, समाजाच्या कृत्याचे आत्मचिंतन  10 डिसेंबर 2024 ला परभणी मध्ये जे संविधान विटंबना प्रकरण झालं त्या नंतर संतप्त संविधान प्रेमीनी तत्काळ न्याय करत आरोपी ला चांगलाच चोप दिला आणी त्याला पोलिसांच्या हावाली सूद्धा केलं.. त्या नंतर ही दूसऱ्या दिवशी सदर घटनेचा निषेध म्हणून कडकडीत बंद केला त्या प्रतिसाद ही मिळाला मग तो शांततेत चालू असताना अचानक दूपारी उद्रेक करत जाळफोळ, दगडफेक, लोकांच्या मालमत्तेचे नूकसान करण्याचे काय कारण, काय साध्य झालं त्यातून..? आज सोशल मीडिया वर समाज माध्यमांवर समाजाची बदनामी करणारे कित्येक विडियो क्लिप्स फिरत आहेत ज्यात झेंडे घेऊन गोरगरिबांच्या मालमत्तेचे नूकसान करताना आपले तरूण दिसतायत ते विडियोस इतर समाजाची लोक रगंवून प्रदर्शित करत आहेत त्यातून समाजा चा पराक्रम किंवा रोष तर दिसत नाही उलट हूल्लड तरूण आणी अशिक्षित लोकांच प्रदर्शन दिसत आहे..! हे कितपत योग्य आहे..?   एखाद प्रकरण आपण कसं हाताळाव हे कधी आपल्याला कधी कळणार..? एका समाजकंटकाची ची सजा पूर्ण समाजाला का..? महाड च्या सत्याग्रहा वेळी सूद्धा जातीवादी लोकांन कडून दगडफेक ...