बाबासाहेबांची रमजान ईदची इफ्तारी एक थोतांड असत्य आणी आंबेडकरवादी बौद्धांचे इस्लाम प्रेम एक धोक्याची घंटा..! वाया म्यानमार - बांग्लादेश एक धावता आढावा

विवेचन | आत्मपरीक्षण | चिकित्सा 

आज काल प्रत्येक ईद ला काही आंबेडकरी भक्त कोणत्या ही गोष्टी ची सत्यता न जानून घेता वॉट्सएप यूनिवर्सिटी वर आलेले कॉपी पेस्ट ज्ञान वाचून असा दावा करतात की "बाबासाहेब अमुक तमूक लोकांन सोबत इफ्तार पार्टी ला गेले होते" पण सत्य तर हे असते की कधी त्यांनी ना बाबासाहेब वाचलेले असतात ना त्यांना आपला इतिहास माहित नसतो.. त्यांना तर फक्त दूसऱ्या धर्माची सण आपल्या स्वार्थी आनंदा पायी साजरी करण्यासाठी फक्त बाबासाहेबांचा आधार घ्यायचा खोट्या कथा इतिहासाच्या कूबड्या घ्यायच्या असतात..! असो आपण आज या वायरल मसेज मधील सत्य आणी पाहूया आणी आंबेडकरवादी बौद्धांचे इस्लामीक अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करू..!


या दाव्या मध्ये पहिला फोटो जो मोठ्या प्रमाणात वायरल केला जात आहे, त्या मध्ये असे लिहले जाते की मौलाना आजाद यांनी रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टी ठेवली होती यानी त्यात बाबासाहेबांनी सहभाग घेतला होता.. पण वास्तविक पाहता.. हा फोटो ना रमजान च्या इफ्तार चा आहे  ना त्यात मौलाना आजाद आहेत.. तर हा फोटो 13 ऑक्टोंबर 1949 रोजी दिल्ली संसद भवन येथे एका अधिकृत सरकारी कार्यक्रमातील आहे ज्यात  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मौलाना फजी - उल - हसन हसरत चर्चा करताना पाहायला मिळतात, मोहनी हे प्रसिद्ध उर्दू शायर आणि संविधान सभेचे एक सदस्य होते त्यांच्या "इन्कलाब जिंदाबाद" या घोषवाक्याचे भारताचा स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान होते.. अशा प्रकारे हा फोटो इप्तारी चा असल्याचा दावा खोटा ठरतो..


या दाव्यातील दूसरा फोटो व त्यात असे सांगण्यात येते की भारत स्वतंत्र झाल्या नंतर पहिल्या रमजान ईद निमित्त पंतप्रधान पंडित नेहरू यांनी इप्तारी आयोजित केली होती आणी त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर ही गेले होते.. पण वास्तविक पाहता.. सी. राजगोपालाचारी यांची लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडून पदभार स्वीकारून भारताच्या गव्हर्नर जनरल पदी नियूक्ती झाल्याच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांनी 20 जून 1948 रोजी स्नेह भोजना चा कार्यक्रम आयोजित केला होता हा त्या वेळेचा फोटो आहे.. 

 वरील फोटो व माहिती पाहता.. असे कळते की त्यातील एक फोटो 20 जून तर दूसरा 13 ऑक्टोंबर चा आहे.. आणी जून / ऑक्टोंबर मध्ये कधीच रमज़ान ईद येत नसते, इतका जरी कॉमन सेंस वापरला तरी हे असत्य थोतांड आहे हे समजते.. या बाबतचे अधिक पूरावे पाहयचे म्हणले तर केंद्र सरकारच्या अधिकृत डेटा मध्ये ही माहिती मिळते.. तसेच अनेक फॅक्ट चेकींग साईट्स वर ही माहिती उपलब्ध आहे त्याची लिंक मी इथे देत आहे त्या खालील निळ्या अक्षरावर टच करून पाहव्यात.. दैनिक जागरण - 🔄 The Hindu


 अगदीच जवळ चा पूरावा म्हणालात तर ऐरोली च्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारका मध्ये जे फोटो म्यूजियम बनवले आहे त्यात ही या फोटोस ची सत्यता व माहितीस्पर इतिहास लिहलेला आहे जो तूम्ही कधी ही जाऊन पाहू शकता.. 
पण मग या सर्वा मधून असा प्रश्न उपस्थित होतो की अशी खोटी माहिती पसरवून कोणाला काय मिळते..? तर मित्रांनो चूकी दूसऱ्याची नसून चूकी आपली आहे.. आपण गर्वाने स्वत: ला बुद्धिस्ट म्हणून घेतो, बाबासाहेबांचे अनूयायी म्हणून घेतो.. आणी काही विचार, वाचन आणी संशोधन न करता एखाद्या गोष्टी ला सत्य समजून त्याला खतपानी घालत राहतो.. रिल आणी फोटोस टाकून मूठभर फोलोवर कमवण्यासाठी धडपड करणारे काही अशिक्षित तरूण त्यांच्या फायद्या साठी हवी ती माहिती लिहून वायरल करतात आणी आपण मेंढराच्या कळपा प्रमाणे किंवा डोळ्यावर झापड लावलेल्या घोड्या प्रमाणे त्या असत्याच्या रस्तावर चालू पडतो..! ज्या बुद्धाने सांगितलं की "मी म्हणतो म्हणून नाही तर तूम्हाला पटलेतर आणी समजले तरच त्या गोष्टी ची सत्यता तपासून विचार करा" त्या गोष्टीला बगल देत आपण अंधभक्तित बुडत चाललो आहे यांचा विचार करा..

बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील सण, कर्मकांड, रूढ़ी - परंपरा, यांचा विरोध केला म्हणजे याचा अर्थ असे नव्हे कि त्यांनी तूम्हाला भारतीय मूळ नसलेल्या मुस्लिमांनच्या इद आणी खिश्चनांचे सण वार साजरे करण्याची सूट दिली आहे..? बाबासाहेबांनी फक्त हिंदू धर्मांतील सण वार आणी कर्मकांडा वर भाष्य करून ते साजरे न करण्यास सांगितले कारण तूम्ही आम्ही पूर्वी हिंदू होतो.. आणी तेच तूमचे हिंदू असणे.. हेच तूमच्या अधोगति ला कारणीभूत होते म्हणून त्याचा त्याग करून विज्ञानवादी बौद्ध धम्म स्विकारणे गरजेचे होते, त्या शिवाय तूमचा उद्धार शक्य नव्हता.. ह्या गोष्टी समजून घ्या..
कोणाचा ही पूळका घेण्याअधी जरा विचार करा..

दोन दिवसा पूर्वी म्हणजे शूक्रवार दिनांक 28 - 03 - 2025 रोजी बौद्ध धर्मीय राष्ट्र असलेल्या म्यानमार मध्ये 7.7 रिस्टर स्केल चा भूकंप झाला ज्यात अनेक आपले बौद्ध बांधव मृत्यु मुखी पडले आणी अनेक प्राचीन बौद्ध स्तूप, मठ, पगोड़ा उद्धवस्त झाले.. ज्यांचा आनंद तेथील रोहिंग्या मुस्लिम साजरा करत आहेत.. आणी आपण इकडे आपल्या बौद्ध बांधवा सोबत सहानुभूति ने उभे राहण्या ऐवजी त्यांच्या दू:खाचा मातम साजरा करणाऱ्या लोकांना साठी समरसता अभियान चालवत आहोत.. हे तेच लोक आहेत ज्यांनी बांग्लादेशात अनेक अल्पसंख्यक बौद्ध भिक्षु ना ठार केले, बौद्ध विहारे जाळली.. हे तेच आहेत जे स्वत:च्या इस्लामिक देशात अल्पसंख्यकांवर क्रूरता करतात.. ज्यांची तालिबान, ISIS अशा शेकडो संघटना आहेत, त्यांनी स्वता:ची क्रूरता झाकण्यासाठी काही वर्षा पूर्वी बौद्ध दहशतवाद अशा वल्गना करून समस्त शांती प्रिय बौद्ध समजाला बदनाम केले होते..

आपण बाबासाहेबांनी हिंदू धर्मा विषयी काय लिहले हे न चूकता वाचतो.. पण त्याच वेळी बाबासाहेबांचे इस्लाम विषयी काय विचार होते हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का..? कधी त्यांचे "थॉट्स ऑन पाकिस्तान" हे पूस्तक वाचले का..? हैदराबाद च्या निजामाची इस्लाम धर्म स्विकारण्याची ऑपर बाबासाहेबांनी का नाकारली याचा कधी विचार केला आहे का..? नाही ना..?

मग ज्या विषयात आपला अभ्यास नाही वाचन नाही तिथे डोके का घूसवायचे..? ज्या इस्लाम धर्मा साठी आज तूम्हाला इतके प्रेम उफाळून येत आहे, त्याच इस्लाम धर्माच्या उदयामुळे आणि त्यांच्या आक्रमणकर्ता मूळे अफगाणिस्तान मधील बामियांपासून बंगलादेशपर्यंतचा बुद्ध धर्म नष्ट झाला हा इतिहास आहे.. आज घडीला अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये आपण आजही अनेक बौद्ध स्तूपांचे खंडर आपण पाहू शकतो, त्यांची तोडफोड कोणी केली..? तेथून बौद्ध धर्म कोणी नष्ट केला..? याचा तुम्ही एक बौद्ध बांधव म्हणून विचार केला पाहिजे, जा हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेवर तुम्ही विद्वान होऊन तुमची मतं मांडता तशीच जाती व्यवस्था आणि भेदाभेद मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म मध्ये सुद्धा आहे मी तर म्हणतो त्यापेक्षाही जास्त कठोर आहे.. मग तूम्हाला हिंदूचा द्वेष म्हणून 22 प्रतिज्ञा आठवतात, आणी मुस्लिमांवर इतके प्रेम का..?  जर बाबासाहेब म्हणाले होते की हे दोन्ही धर्मांध कट्टरपंथी आहेत.. मग बौद्ध धम्म नाकारून इन्स्टाग्राम वर Proud to be Buddhist लिहून इस्लाम च्या गळ्यात पडणे कितपत योग्य..!

बुद्ध धर्माबद्दल असलेल्या आपल्या अनस्तेमुळेच (अज्ञानता) भारतामध्ये बाबासाहेबांनंतर बौद्ध धम्मचक्र ज्या वेगाने फिरायला पाहिजे होते तसे झालेले नाही, त्या प्रमाणात बाबासाहेबांचे स्वप्न होते की त्यांना हा देश प्रबुद्ध करायचा होता तसे ही झाले नाही कारण आपणच कुठेतरी कमी पडतोय.. आपल्याला आपल्याच धर्माविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नाहीसा झाला आहे.. काही मुठभर बौद्ध वगळता आपल्याला आपलाच इतिहास माहित नाही, आपले शत्रू कोण आणि आपले मित्र कोण हे माहीत नाही, आपण बौद्ध असून आपण आजही गुरुवारी हिंदू होतो.. शुक्रवारी जुम्मा मुबारक करतो, दर्ग्यावर जातो स्टेटस टाकतो.. काहीजण संडेला रविवारी चर्चमध्ये जातात खिश्चन होतात.. त्यामूळे तुमच्या या इतर धर्माच्या प्रेमा मुळे आपल्या बौद्ध धर्माच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाले आहेत.. आज दक्षिण भारतातील अनेक दलित जाती याच अनास्थेमुळे आणि अज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मीय झाल्या आहेत त्यांनी हिंदू धर्म सोडला असला तरी त्यांना ख्रिश्चियन आणि मुस्लिम धर्मातही समानतेची वागणूक कधीच मिळालेली नाहीये कारण हिंदू असो वा मुसलमान, ख्रिश्चन प्रत्येक धर्मामध्ये भेदाभेद आहे व त्यांचा पायाच विष्मतेवर रचला गेला आहे.. त्यामुळे खोट्या अमिशाला आणी दिखावू कल्चर ला बळी न पडता.. आपल्या सर्वाच प्राचीन धर्माचा अभ्यास करा तूम्हाला अभिमान वाटेल.. आणी सर्व काही फिके वाटेल असा आपला बौद्ध धम्म आहे.. त्याचे रिच कल्चर आहे.. फक्त भीम जयंतीला बौद्ध व इतर दिवशी सर्वधर्मसमभावाचे झेंडे घेऊन फिरण्यापेक्षा आपल्या धर्माचा अभ्यास करा आणि बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारत करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामी हातभार लावा.. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी वर आलेल्या कोणत्याही कॉपी पेस्ट ज्ञानावर विश्वास ठेवून स्वतःचे अज्ञान व हसू करण्यापेक्षा बुद्ध, फुले, बाबासाहेब इत्यादी महापुरुषांचे आणि लेखकांची पुस्तक वाचा तोच तुमच्या खरा मुक्तीचा मार्ग असेल..

 जय भीम

                  ...... ✍️#दsuryawanshi



( टिप - गरज पडल्यास पूढील भागात बाबासाहेबांचे इस्लाम विषयी विचार.. इस्लाम राजकर्ता नी बौद्धचा कसा नरसंहार केला, इस्लाम कसा बुद्ध धम्मासाठी मारक आहे.. इस्लाम व बौद्ध धम्माचा संबंध व प्राचीन इतिहास.. आजच्या काळात इस्लामिक देशात बौद्धांचे चाललेले दमन.. व अशा अनेक जियो पॉलिटिकल विषयावर सविस्तर लिहण्यात येईल..!)






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Parbhani Violence | परभणी चे संविधान प्रकरण आणी संयम, स्व:नियंत्रण हरवलेला आंबेडकरी समाज | एक कडवट आत्मचिंतन आणी प्रशासकीय कारवाईचे परिक्षण

The Face Of Buddhist Terror | बुद्धाचे अहिंसा तत्व व बौद्ध देशाचा आंतकवाद की अस्तित्वाची लड़ाई | Buddhism