Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

विषय- बुद्ध हा विठ्ठल नव्हे ना विष्णुचा अवतार.. वाचा बुद्ध कोण आणी पंढरपुरचा विठ्ठल कोण..? बौद्धांचा वारसा काय ऐतिहासिक दृष्टिकोणातून..! 
★ प्रकरणाची पार्श्वभूमी / परिचय -
      जर वर्षी जसा पावसाळा सूरू होऊन आषाढ महिना जवळ येतो तसे एकीकडे महाराष्ट्रात पंढरपूर वारी ची लगभग सुरू होते.. तर दूसरी कडे काही महान बौद्ध / आंबेडकरवादी संशोधक आणी बुद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आषाढी पौर्णिमेला सूरू होणाऱ्या वर्षावासाचे स्वागत व तयारी, त्यावर लिखान / पोस्ट / प्रचार - प्रसार करण्या ऐवजी संपुर्ण समाज एका प्रचंड विश्रांतीच्या काळा नंतर उठतो आणी जर वर्षी ठरल्या प्रमाणे एक दावा ठासून करतात की ¹पंढरपुरचा विठ्ठल हा बुध्द आहे.. ²ती विठ्ठलाची नव्हे तर बुद्धाची मूर्ती आहे.. ³आणी ते मंदिर नव्हे तर बुद्ध विहार आहे, विद्यापीठ आहे..! पंढरपुरचा विठ्ठलच बुद्ध आहे याचे काय पूरावे आहेत असे म्हणल्यास त्यांच्या या बोलण्याला तीन पूरावे असतात.. ¹मूर्ती, ²मंदिरांचा इतिहास, ³ वारकरी संतांचे अभंग, आज आपण ह्याच घहन विषयावर चिकित्सा करूण प्रकाश टाकणार आहोत.. आणी समजून घेणार आहोत कि काय खरचं विठ्ठल म्हणजे बुद्ध आहे..? पंढरपुरचे मंदिर बुद्ध विहार आहे..? चला तर मग पाहूया.,
         या प्रश्नाचे सविस्तर आणी समाधानकारक उत्तर मिळवण्यासाठी अनेक ऐतिहासिक बाबी पाहावया लागतील.. ते पाहात असताना आपल्याला बुद्ध धम्माचे विविध टप्पे अभ्यासावे लागतील त्यातून असे लक्षात येईल कि ४ थी धम्म परिषद जी कुषान सम्राट कनिष्क यांनी इसवी सन 72 मध्ये कूंडलवन काश्मीर येथे बौद्ध भिक्कू अश्वघोष यांच्या अध्यक्षते खाली भरवली होती.. या परिषदेत बुद्ध धम्माचे दोन वैचारिक पंथ (गट) पडले, एक महायान आणी दुसरा थेरवाद हा जो दुसरा थेरवाद पंथ आहे तो जसा मूळ बुद्ध धम्म होता तसाच राहिला.. पण महायान पंथाने बुद्ध धम्मात मूर्तिपूजेची सूरूवात केली आणी मग या महायान पंथाचे पूढे हळू हळू अनेक उपपंथ पडत गेले.. महायानातून पूढे तंत्रयान, मंत्रयान आणी त्यातून इव्होलेशन होत होत वैष्णव पंथा पर्यंत त्याचा विस्तार झालेला दिसतो..! त्यामूळे मूळ बुद्ध धम्मातील अनेक मूर्त्या ह्या काळानूसार विद्रूप होत होत त्या हिंदू धर्मीय झाल्या आहेत.. मग प्रश्न असा निर्माण होतो की पंढरपुरची मूर्ती नक्की कोणाची..? त्या साठी आपल्याला मूर्ती स्थापत्य कला आणी काळानूसार इतिहास समजून घ्यावा लागेल..! तो आपण खाली टप्या टप्याने पाहू
बुद्ध मूर्ती व विठ्ठल मूर्ती
विठ्ठलाची मूर्ती हीच बुद्धाची मूर्ती आहे हे सांगण्यासाठी भक्तांकडून दिला जाणारा संदर्भ म्हणून ज्या फोटो सोशल मीडिया वर फिरत आहेत त्या पैकी एक सांची म.प्र  संग्रहालयातील नागराजाची आहे.. एक मध्यप्रदेश च्या उदयगिरी हिंदूलेण्यातील 6 नंबर लेणीची आहे.. तर एक बदामी च्या हिंदू लेण्यातील आहे.. सांची येथील हे शिल्प आणि त्याचे दोन फोटो मी येथे खाली संर्दभ म्हणून दिले आहेत ते पाहून तुमच्या लक्षात येईल की हि बुद्ध मूर्ती किंवा बोधिसत्व मूर्ती नसून ते एक नाग राजाचे शिल्प आहे जे सांची मध्ये अनेक ठिकाणी सापडतात.. या मूर्तीच्या पायाशी एक नेमप्लेट देखील लावलेली आहे ज्यावर ह्या शिल्पाचे नाव दिलेले आहे.. (संदर्भा साठी खालील फोटो पाहा)
  न वाचता न समजता कोणी तरी, काही तरी खोटे सांगते आणी आपण तेच सत्य समजून बसतो हे चूकीचे आहे.. केवळ एखाद्या मूर्तीने कमरेवर हात ठेवले आहेत म्हणून ती बुद्ध मूर्तीच किंवा विठ्ठल मूर्तीच आहे असे म्हणता येणार नाही..! स्थापत्य कलेत प्रत्येक एका मूर्तीचा वेगळेपणा असतो.. प्रत्येक शिल्पाचे एक वेगळे वैशिष्ट्ये असतात जसे राजे महाराजे शाही कपड्या सह असतात, 
   तर बुद्ध मूर्ती बाबत बुद्धाचे केस, कानाच्या पाळ्या,चिवर, बसण्याच्या व हाताच्या मूद्रा हे काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये आहेत.. जे बुद्धाच्या सर्व मूर्त्यां मध्ये प्रामूख्याने आढळतात.. विलक्षणीय बाब म्हणजे बुद्ध मूर्तीवर कधी ही मुकुट नसतो..! इतिहासात पाहता बौद्ध धम्माचा प्रचंड गतीने वाढता प्रभाव पाहून तात्कालीन इतर सर्व धर्मानी बुद्ध धम्माची स्पर्धा करण्यासाठी बुद्ध धम्माचे तत्वज्ञानच नव्हे तर बौद्ध स्थापत्य कला ही अनुसरलेली (कॉपी) केलेली आहे.. त्यातील पहिला व मोठा संघर्ष म्हणजे जैन धर्माशी झालेला दिसतो.. त्यानंतर तो वैदिक धर्माशी होत असताना शैव, वैष्णव या पंथांशी झालेला आहे.. हा संघर्ष समजून घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे ती म्हणजे जैन लोकांनी बुद्धाच्या सारखीच हूबेहूब महावीर तथा इतर तिर्थकर यांच्या मूर्त्या निर्माण केल्या.. त्या इतक्या सिमीलर आहेत की कधी कधी बुद्ध कोण आणी महावीर कोण हा फरक करणं अभ्यासकांना सूद्धा अवघड होऊन जातं.. आता इथे बुद्ध आणी महावीर मूर्ती सारखी असल्यामूळे महावीरांच्या शिल्पाला आपण बुध्द मूर्ती म्हणू शकत नाही.. तर ते शिल्प महावीर तथा इतर जैन तीर्थंकर यांचेच म्हणावे लागते.. मग इथे तर बौध्द धर्माच्या शिल्पात असलेली संपूर्ण शिल्पकलाच चोरलेली आहे.. इतकेच नव्हे तर बौद्ध प्रतिकांपासून स्तूप, त्रिरत्न, बौद्ध धर्मातील अनेक प्राणी आणि इतर बुद्ध प्रतीक जैन धर्मात हे पाहायला मिळतात.. परंतु त्यावर कोणी आपला अधिकार सांगत नाही कारण ते जैन शिल्प आहेत.. हे सर्वमान्य केले जाते कारण ते करावेच लागते तसा नियमच आहे.. बुद्ध धम्मा पासून पूढे विकृत झालेले कोणते ही शिल्प आमचे आहे असे म्हणणे हे अतिशय अशिक्षितपणाचे लक्षण आहे.. जैन शिल्प ही बौद्ध शिल्पकलेवरच निर्माण केलेली आहेत अगदी बुद्धा सारखेच रूप निर्माण केले याचे कारण काय असावे तर बौद्ध धर्माला शह देणे हे एकमेव कारण होते.. त्यामुळे इतरांनी निर्माण केलेली कोणती ही जैन शिल्प / कलाकृती आपण बौद्ध धम्माची कलाकृती आहे असे म्हणता येणार नाही.. (बुद्ध आणी महावीर यांचा फोटो)
      पुढे बौद्ध धम्माचा जो खरा संघर्ष झाला तो वैदिक हिंदू धर्माशी झालेला आहे.. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याने शिव व विष्णू यांच्या नावाने उदयगिरी लेणी जी मध्य प्रदेशात आहे ती निर्माण केली.. तिथे त्यांने हिंदू धर्माशी संबंधित अनेक मूर्त्या घडवून घेतल्या त्यात विष्णुच्या अनेक अवतारा मधील शिल्प आपणास पाहायला मिळतात. तसेच चंद्रगुप्त याचा शिलालेख ही आपणास तिथे पाहायला मिळतो.. सूरूवातीचे  गूप्त जरी बौद्ध असले तरी पूढे आठव्या शतकाच्या शेवटी गूप्त घराण्याचे काही राजे हे हिंदू धर्माच्या शैव व वैष्णव पंथाचे पालण करू लागले होते.. या काळात बौद्ध धम्माला उतरती कळा लागली.. म्हणून या काळा नंतर बौद्ध स्थापत्याची नव निर्मिती जास्त पाहायला मिळत नाही.. या काळात निर्माण झालेली अनेक शिल्प ही बौद्ध शिल्प कलेच्या आधारावर निर्माण केली गेलेली हिंदू शिल्पे आहेत.. जसे विष्णु चे शेषनागावरील आराम शिल्प हे बुद्धाच्या महापरिनिर्वाण मूद्रेतील मूळ शिल्पाची प्रतिकृती आहे.. (संदर्भासाठी खालील फोटो पाहा)
       तसेच बोधिसत्वांच्या शिल्पा प्रमाणे विष्णुचे विविध शिल्प निर्माण करण्यात आले.. हा बौद्ध धम्माच्या शिल्पकलेला पर्याय व बौद्ध धम्माच्या प्रचाराला शह देण्यासाठीचा प्रयत्न होता.. म्हणून याचा अर्थ असा अजिबात होत नाही की ते शिल्प बौद्ध धर्मातील आहेत.. किंवा बोधिसत्त्व शिल्प अथवा बुद्ध शिल्पच आहेत.. असे म्हणने म्हणजे मूर्खपणा होय.. त्याच प्रमाणे शैव पंथाने देखील अशीच बौद्ध शिल्पकला स्विकारली दिसते त्यांनी शिवाचे रूप / प्रतिक म्हणून बौद्ध स्तूपा सारखी शिवाची पिंड हा प्रकार तयार केलेला दिसतो.. शैव पंतीय शिवलिंग हे बौद्ध धम्मातील स्तूप या संकल्पनेशी निगडित आहे.. आता ही शिल्प बौद्ध शिल्प होऊ शकत नाहीत, जसे जैन शिल्प बौद्ध शिल्प होत नाहीत, तसेच कोणतेही हिंदू वैदिक शिल्प / कलाकृती ही बौद्ध धर्मीय होऊच शकत नाही.. इतिहासात प्रतिक्रांती करून अनेक वैष्णव मंदिरात बुध्द हा विष्णूचा अवतार म्हणून इसवी सणाच्या आठव्या शतकात स्वीकारला गेला.. त्या मागचा उद्देश्य बुद्ध धम्म हा वैदिक संस्कृतीचा भाग आहे हे दाखवणे होता.. बुद्धाला विष्णुचा अवतार म्हणून प्रचार करणे हे ही त्याचाच भाग होता.. त्यामुळे आठव्या शतकाच्या काळानंतर निर्माण झालेल्या मंदिरां मध्ये बुद्ध हा विष्णूचा अवतार म्हणून दाखवला गेला आहे.. त्याचा अर्थ ते मंदिर बुद्ध विहार आहे असा शोध लावणे चुकीचे ठरते कारण ते बुद्ध धम्म विकृत करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.. म्हणून त्या मंदिरावर हक्क सांगणे हे देखील एक प्रकारे बुध्द विष्णूचा अवतार आहे स्वीकारण्या सारखेच होईल..! हिंदू जैन प्रमाणेच मुस्लिम धर्मातील शिल्पकालेवर देखील बौद्ध संस्कृतीच्या शिल्पकलेचा प्रभाव पडलेला दिसून येतो.. उदाहरणात मूस्लिम धर्माचे घूमूट हे बौद्ध विहाराच्या गुंबदाची प्रेरणा आहे.. त्यामुळे त्या वास्तू ही आमच्या बौद्ध धर्मातील आहेत असे म्हणणे हे आपल्या अशिक्षितपणाचे लक्षण ठरेल..!
           Viral Image - Udhygiri Caves M.P
   तूम्ही आज ज्या मूर्त्यांचे दाखले देत आहात त्या फोटो ना बुद्धाच्या आहेत ना बुद्ध विहार लेणीतील आहेत.. अशा मूर्त्या बुद्ध लेणी, विहार किंवा पंढरपुरातच नव्हे तर विष्णुचा अवतार असलेल्य विठ्ठलाच्या या मूर्ती भारतभर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.. उदाहरणार्थ विजयनगरच्या हम्पी येतील मंदिरात.. तमिळनाडूत श्रीरंगम् (जि. तिरुचिरापल्ली), रंगनाथमंदिरात, तंजावर येथील विष्णुमंदिरात जी विठ्ठलमूर्ती आहे ती श्रीदेवीभूदेवीसह आहे.. बेल्लारी जिल्ह्यातील विरूपाक्षमंदिरात ही विठ्ठलमूर्ती आहे.. तसेच कर्नाटकात मंड्या जिल्ह्यातील गोविंदहळ्‌ळी येतील.. हसन जिल्ह्यातील हरणहळ्ळी येथे चेन्न केशवाच्या मंदिरातील मूर्ती.. वसरूल (जि. मंड्या) येतील मल्लिकार्जुन मंदिरातील आणि नागलापूर (जि. तुमकूर) येथे ही विठ्ठल मूर्ती आहे.. अजून अश्या बऱ्याच ठिकाणी तूम्ही विष्णु विठ्ठलाच्या मुर्त्या पाहू शकता..!
     वरील गोष्टीचा विचार केला असता कोणते हि शिल्प बुद्ध शिल्प ठरत नसते.. कोणती हि कलाकृती बौध्द कलाकृतीच नसते तर त्यावर बौध्द शिल्पकलेचा प्रभाव असू शकतो.! हे आपण समजून घेतले पाहिजे. बुद्धाच्या मुखासारखे दिसणारे सर्वच चेहरे हे बुद्धाचे नसतात..! कधी ते महावीर असू शकतात तर कधी पार्श्वनाथ हि असू शकतात.. तसेच बोधिसत्वा प्रमाणे दिसणारी प्रत्येक शिल्प हि बौध्द शिल्पच असतील असे नाही तर काळानूसार काही ठिकाणी ते शिल्प विष्णूचे असू शकते.. तर काही ठिकाणी ते शिल्प शिवाचे हि असू शकते.. त्यामुळे केवळ आपल्या धम्मातील शिल्पाप्रमाणे एखादे शिल्प दिसते म्हणून लगेच ते आमचे आहे असे म्हणणे अगदीच चुकीचे ठरते.. कोणतेही शिल्प कोणी, कशासाठी आणी काय उद्देश्याने घडवले आहे त्याचे कारण अत्यंत महत्वाचे ठरते.. एखादे शिल्प कोणते आहे हे समजून घेण्यासाठी त्या शिल्पाची कलाकृती निरीक्षणाने तपासून पहावी लागते.. शिल्पाचा कालखंड तपासून पाहावा लागतो.. शिल्प निर्माण करताना कोणती शैली वापरलेली आहे ती पहावी लागते.. शिल्पाचे साम्य पाहिले जातात.. त्या मूळे कोणतेही शिल्प / मूर्ती बुद्धाचीच आहे असे म्हणण्या आधी आपण बुद्ध मूर्तीची वैशिष्ट्य समजून घेणे आवश्यक ठरते.. बुद्ध मूर्तीचा कालखंड तपासून घेणे आवश्यक ठरते.. कारण आठव्या शतका नंतर बुद्ध धम्म मोठ्या प्रमाणावर लयास गेला होता.. भारताच्या फक्त काही काना कोपऱ्यात धम्म तग धरून होता.. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर अखंड भारतात अनेक सत्ता स्थापण झाल्या त्यातील बहुतांश हिंदू होत्या.. हाच काळ होता जेव्हा मूस्लिम आक्रमने होण्यास सूरूवात झाली होती.. म्हणून त्या नंतर च्या काळात बुद्ध मूर्त्या किंवा कलाकसूरी पहिल्या सारख्या निर्माण होत नव्हत्या.. तर बुद्ध शिल्पकलेला कांऊटर करून इतर धर्मियांनी स्वत:ची नवीन शिल्पे बनवली ज्यावर बौद्ध स्थापत्याची छाप होती.. म्हणून उठ सूट कोणते हि शिल्प बुद्ध शिल्प म्हणता येत नाही हे आपण समजून घेणे फार आवश्यक आहे..! 
पंढरपुर आणी मंदिरांचा इतिहास -
मग आता तूम्ही म्हणाल की जर पंढरपुरची मूर्ती बुद्ध मूर्ती नाही आणी ते मंदिर ही बुद्ध विहार नाही..! तर मग ते काय आहे त्याचा काय इतिहास आहे..? असा प्रश्न उपस्थित होतो.. त्यासाठी इतिहास आणी मंदिराची स्थापत्यकला पाहिली असता पंढरपूरतील जे मूळ मंदिर आहे त्यात एकून सोळा स्तंभ आहेत त्यापैकी एका खांभाच्या तुळई वर संस्कृत आणि कानडी भाषेतील शिलालेख आहे.. ज्यामध्ये पंढरपूर चा उल्लेख 'पंडरगे’ असा आहे, कारण मुळात पंढरपूर हे प्राचीन काळातील कानडी (कर्नाटक) प्रदेशाचा भाग होता, आज ही हे ठिकाण महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या सोलापुर जिल्हात आहे. या शिलालेखात हे मंदिर शके 1195 म्हणजे इसवी सन 1273 साली देवगिरीच्या यादवांचा सामंत “विठ्ठल देव नायक” याने उघड्यावर असलेली ह्या मूर्तीचे एका छोटेसे मंदिर बांधून त्याची प्रतिष्ठापना केली आहे असा उल्लेख त्याच्या या शिलालेखात केलेला आहे.. त्या शिलालेखाची फोटो ही मी इथे देत आहे.. (संदर्भासाठी पंढरपुरचा कन्नडी शिलालेख)
     या संदर्भात अधिक माहिती तूम्ही सोलापूर गॅजेट मध्ये पाहू शकता.. पूढे पंढरपुरच्या इतिहासा विषयी जमनादास खोब्रागडे आणी रामचंद्र भांडारकर यांनी आणखी दोन शिलालेखांचा उल्लेख केलेला दिसतो.. त्यामध्ये त्यांचे असे मत आहे कि, 1249 सालाचा शिलालेख हा बेळगाव जिल्ह्यातील एका गावाचे दान पुंडरीक क्षेत्राला दिल्याचा उल्लेख आहे, हे क्षेत्र भिमा तिर्थी पवित्र क्षेत्र असून विष्णूच्या समिप आहे असा उल्लेख आढळतो.. यातून स्पष्ट होते कि हे पंढरपुर विष्णू / वैष्णव संप्रदायाचे ठिकाण आहे..! पुढे दुसरा शिलालेख आहे जो 1270 सालाचा आहे ज्यामध्ये “आप्तोराम्य यज्ञ” जो विष्णु साठी केला जातो.. तो पांडुरंगपूर इथे केल्याचा उल्लेख आहे..! म्हणजे येते हि पंढरपुर विष्णूशी निगडीत आहे हे सिद्ध होत आहे.. विष्णूला कानडी (कन्नडा) भाषेत विठू म्हणतात.. म्हणून महाराष्ट्रातील काही भक्ती गिता मध्ये विठ्ठलाला “कानडा राजा पंढरीचा” असे ही म्हणले आहे..! 
    (विठ्ठल मूर्तीचा वेगळेपणा दर्शवणारे वैशिष्ट्ये - लक्षण )
    इतके सांगून ही भक्त ऐकणार नाहीत त्यातील काही जन परत म्हणू शकतात की पंढरपुरच्या मूळ दगडी विठ्ठल मंदिराच्या मंडपावर ज्ञानी बुद्धांच्या मुर्त्या आहेत..? त्या विषयी शोध घेतला असता असे लक्षात येते की त्याचा उल्लेख सर्वप्रथम जॉन विल्सन यांच्या “मेमॉयर्स ऑन दि केव्ह टेम्पल” या ग्रंथा मध्ये पाहायला मिळतो त्यात हे मंदिर बुद्ध विहार असल्याचे म्हटलेले आहे.. परंतु त्यानंतरचे संशोधक जॉन विल्सन यांच्या पुस्तकात दिलेला दाखला वाचल्यावर त्यांचे मत हे लेण्यांच्या शैली बाबत असल्याचे आढळून येते.. पंढरपुरचे मंदिर हे विहार आहे असा लिखित पूरावा कूठेच सापडत नाही..! विठ्ठल मंदिरात असलेल्या त्या बुद्ध मुर्त्या ह्या विष्णूच्या अवतार म्हणून तेथे कोरलेल्या आहेत.. भारतात अश्या अनेक मंदिरांची शृंखला आहे जिथे विष्णूचा अवतार म्हणून बुद्ध मूर्त्या कोरल्या आहेत, ज्याची उदाहरणे आपण वरील मूर्तीकला भागात पाहिली.. त्या शिवाय महाराष्ट्रा विषयी बोलायचे म्हणले तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील लक्ष्मीकेशव मंदिरात कोरलेल्या विष्णुच्या दशावतांरांत बुद्ध म्हणून कोरलेली मूर्ती विठ्ठलाचीच असल्याचे जाणवते.. इतकेच काय तर आता नव्याने झालेल्या अयोध्याच्या राम मंदिरातील रामाच्या नव्या मूर्ती वर सूद्धा बुद्ध रूप कोरण्यात आले आहे म्हणून काय नवे राम मंदिर बुद्ध विहार ठरवता येईल काय..? या गोष्टीचा आपण चौकस बुद्धिने विचार करणे आपेक्षित आहे..! विष्णु आणी बुद्धाचे हे प्रकरण फक्त हिंदू धर्मात नव्हे तर जैन साहित्यात जैनांनी देखील विठ्ठल हा जैन असल्याचे म्हटले आहे.. कारण जे विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन आहे तेच वर्णन जैन तीर्थकर नेमिनाथ यांच्या मूर्ती सारखे मिळते जूळते आहे.. त्यामुळे जैन देखील विठ्ठल हा नेमीनाथ असल्याचे म्हणतात.. कृष्ण आणि नेमीनाथ यांचा संबंध जैन धर्मात पाहिला जातो.. मग जर पंढरपुरच्या मंदिराला बुद्ध विहार ठरवले गेले तर जैन सूद्धा त्यावर दावा सांगतील..! मूळात बुद्धाला विष्णूचा अवतार करून महाराष्ट्रातीलच नव्हे तर दक्षिणेतील बौद्ध धम्म संपवण्याचे काम ह्या सनातनी लोकांना करायचे होते आणी त्यांनी ते केले आहे.. लोकांच्या मनात हे निर्माण करून दिले कि हा बुद्ध म्हणजे विष्णूचा अवतार आहे विष्णुच आहे.. इतिहासातील प्रतिक्रांतीची हि लक्षणे लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे.. नाही तर पंढरपुरच्या मंदिरा वर आपला हक्क आणी विठ्ठलच बुद्ध आहे हे सांगण्याच्या नादात आपण त्यांच्या ह्या षड्यंत्राला बळी पडून आपल्याच अवनतीला आपणच जबाबदार राहू..! अंततः वरील बाबी लक्षात घेता हे ही स्पष्ट आहे की पंढरपुरचे मंदिर हे बौद्ध विहार नसून बुद्ध धम्म बऱ्यापैकी लोप पावल्या नंतर म्हणजेच इसवी सनाच्या आठव्या शतका नंतर ते मंदिर बांधले गेले असून ते मंदिरच असल्याचे पूरावे आहेत.. या उलट बौद्ध विहार असल्याचा एक ही लिखीत अथवा पूरात्तवीय पूरावा आज उपलब्ध नाही..!
संत वाणीतील विष्णु अवतारी बुद्ध -
वरील दोन गोष्टी वरून स्पष्टता आली असली तरी, असा प्रश्न निर्माण होतो की जर ती मूर्ती ही बुद्धाची नाही.. ना ते मंदिर ही बुद्ध विहार नाही मग विठ्ठलाला मानणाऱ्या वैष्णव वारकरी संप्रदायाच्या संतानी त्यांच्या अभंग, ओव्या, किर्तना मध्ये बुद्धाचे नाव का घेतले आहे..? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना आणी नकली, अशिक्षित बौद्धांच्या शेवटच्या आणी महत्वपूर्ण पूराव्याचे खंडण करण्यासाठी आपल्याला त्या संत साहित्याची भाषा व अर्थ समजून घेणे प्रायः ठरते.. प्राथमिक पाहता बुद्धाचे भक्तगण ज्यांना नीट मराठी ही समजत नाही ते प्राकृत- मराठीचा अर्थ समजून न घेता डोळे झाकून संतांच्या श्लोक व अभंगाचे दाखले देतात.. संस्कृत किंवा प्राकृत- मराठी मध्ये संतानी बुद्ध हा विष्णुचा अवतार म्हणून प्रकटला आहे हेच सांगितले आहे.. त्यातील काही अभांगाचे आपण विश्लेषण येते पाहू..!
१) यातील वारकरी पंरपरेतील संत जनाबाई काय म्हणते ते पाहा -
“होउनिया कृष्ण कंस वधियेला ;
आता #बुद्ध झाला माझा सखा”
यात जनाबाई स्पष्ट सांगतात की कृष्ण होऊन ज्याने कंसाला मारले आहे तो (विष्णु) आता माझा सखा (कृष्ण रूपी) बुद्ध झाला आहे.. याचा अर्थ स्पष्ट आहे कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूच्या अवतारात बुद्ध हा ९ वा अवतार आहे. अश्या प्रकारे संतांच्या साहित्यात संतानी बुद्धाला कृष्ण/विष्णु/ विठ्ठल केले हे इथे स्पष्ट होते..!

२) संत नामदेव काय म्हणतात ते पाहा
गोकुळीं जन्मला श्रीकृष्ण आठवा । होऊनि पांडवां साह्यकारीं ॥१०॥ व्रतभंगासाठीं बौद्ध अवतार । झाला दिगंबर अवनिये ॥११॥
कलंकि अवतार होणार श्रीहरि । तेव्हां पृथ्वीवरी तृण न उरे ॥१२॥ ऐसा कष्टि होऊनि बौद्ध राहिलासी । तू कलंकिया लोकां मारिसी ।
अर्थात संत नामदेव त्यांच्या या अभंगात म्हणतात की ज्यांने पांडवाना सहकार्य करण्यासाठी गोकूळात कृष्ण होऊन जन्म घेतला, त्यानेच आता व्रत भंगा साठी बौद्ध अवतार घेतला आहे.. आणी हाच अवतार घेणारा श्रीहरी (विष्णु) कलयूगात कलकी अवतार घेऊन समूळ पृथ्वी वरील लोकांचा नायनाट करणार आहे..! इथे नामदेवानी विष्णुने घेतलेल्या अवतारांचा आढावा घेतला आहे त्या वरून हे स्पष्ट होते की जो विठ्ठलाच्या रूपात आहे तोच कधी कृष्ण होता, तर आता तोच बुद्ध म्हणून आहे आणी तोच पूढे कलकी होणार आहे..!

३) संत नामदेव काय म्हणतात पहा .
"बुद्ध अवतारी आम्ही झालो संत ।
वर्णवया मात नामा म्हणे । "
यामध्ये नामदेवांने बुद्धाला अवतारी” म्हणले आहे म्हणजे “बुद्ध (विष्णु) याने अवतार घेतला आहे (विठ्ठलाचा) म्हणून आम्ही संत झालो आहे” असा स्पष्ट उल्लेख नामदेव महाराज करतात..

४) संत बहिणाबाई काय म्हणतात पहा, 
“कलियुगी हरी #बुद्ध रुपधरी ।
तुकोबा शरीरी प्रवेशला” ।। 
कलियुगात हरी (विष्णु) हा बुद्ध रूप धारण केलेला आहे.. आणि त्याने तुकोबांच्या शरीरात प्रवेश केला आहे.. हिंदू धार्मिक साहित्यात हरी हे कृष्णाला उद्देशून म्हणले जाते, इथे बहिणाबाईनी बुद्धला हरी कृष्ण म्हणजेच विष्णु ने धारण केलेले रूप मानत आहे..!

५) संत बंका महार काय म्हणतात पहा 
“एकोनी बंका करित उत्तर ।
बौद्ध अवतार पांडुरंग” ।। - 
“बुद्ध (विष्णु) हा अवतार घेऊन पांडुरंगा झाला आहे” हे असे या संताना सांगायचे आहे. 

६) संत तुकाराम काय म्हणतात पहा 
बुद्ध अवतार माझीया आदृष्टा ।
मौन्य मुखे निष्ठा धरियली ।
तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध |
शुद्ध त्याशी शुद्ध बुद्ध व्हावे” || 
या अभंगात सूद्धा बुद्ध काय आहे तर अवतार आहे..
         बुद्ध धम्मात किंवा साहित्यात कूठे ही आढळत नाही की बुद्ध अवतारी पूरूष होते किंवा त्यांनी काही जादू - चमत्कार केले..! कारण बुद्ध स्वत: म्हणतात की मी मार्गदाता आहे मूक्तीदाता नव्हे.. बुद्ध स्वत: देव व अवतारवाद नाकारतात, मग जर बुद्ध अवतार घेत नाहीत, तर हे संत कोणत्या अवतार आणी कोणत्या बुद्धा बद्दल बोलतात..? तर ते हिंदू धर्माच्या मान्यते नूसार विष्णु देवाने जे दहा अवतार घेतले त्यातील नववा अवतार बुद्ध आहे.. म्हणजेच हे सगळे संत बुद्धाला विष्णु मानत आहेत.. आणी विष्णु समजूनच ते बुद्धाने विठ्ठल म्हणून रूप धारण केले असे आपल्या वाणीतून सांगत आहेत.. कारण त्या वेळी बुद्धाला मानणारा मोठा वर्ग होता.. म्हणून संतांच्या सर्वच्या सर्व ठिकाणी बौद्ध / बुद्ध नावाने आलेले अभंग हे केवळ अवतारवाद सांगणारे आहेत. आणी बौद्ध धम्मात अवतार सारख्या अंधविश्वास, थोतांडाला काहीच स्थान नाही.. मग आता सांगा विठ्ठल कसा काय बुद्ध होऊ शकतो..? १२ व्या शतकात जेव्हा बौद्ध धम्म पूर्ण पणे लयास गेला होता, तेव्हा समाजात घट्ट रूजलेल्या बौद्ध विचारांची एकजूट करून संतांनी वारकरी संप्रदाय उभा केला.. बुद्धाची शिकवणूकच संतांनी आप आपल्या अभंगातून आप आपल्या पद्धतीने लोकांन समोर मांडली.. आणी काळा नूसार अस्तित्वात असलेल्या हिंदू धर्मात, जो बुद्ध परंपरेतून आलेला वैष्णव पंथ आहे त्यांच्या अनुयायींनी विष्णुच्या विठ्ठल रूपाला पुजले आहे.. कारण हिंदू मान्यते नूसार विष्णुने ज्या विविध रूपात अवतार घेतला त्यापैकीच एक विठ्ठल आहे तर एक बुद्ध..! अंततः वरील संताच्या वाणीत आपण फक्त विष्णुचे बुद्ध रूपचं पाहतो पण संतानी फक्त बुद्धाच नाव न घेता सोबतच कृष्ण आणी कलकी अवताराचा सूध्दा उल्लेख करून बुद्ध असो वा विठ्ठल, कृष्ण असो वा कलकी हे सर्व विष्णु चे रूप आहेत हेच सांगण्याचा आणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे..! मग आता सांगा कोणाचे ऐकायचे जनाबाई, नामदेवाचा विष्णु अवतारी बुद्ध की बाबासाहेबांचे वास्तविक खरा बुद्ध.. ? एकी कडे आपण बुद्ध अवतारी पूरूष नाही, बुद्ध देव नाही म्हणून छाती ठोकपणे सांगतो आणी परत दूसरी कडे पंढरपुरच कोडं काढून बुद्धच कसा विठ्ठल आहे हे ही सांगतो..? 
(आजच्या परस्थिती ला शोभेल असे मीम)
     हिंदू धर्म साहित्या नूसार विठ्ठल हा विष्णुचा अवतार आहे हे स्पष्ट आहे..! जर तूम्ही बुद्धच विठ्ठल आहे म्हणताय म्हणजे बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे ह्या संताच्या आणी सनातनी लोकांच्या खोट्या प्रचाराला तूम्ही दूजोराच देताय आणी बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञेला बगल..! बुद्ध धम्म आणी त्यांचे विचार संपवण्यासाठी ज्या संतानी बुद्ध हाच विष्णु (विठ्ठला) चा अवतार आहे हे लोकांच्या मनावर बिंबवले व इथल्या बुद्ध मानणाऱ्या लोकांना विष्णु पुजेकडे वळवण्यात जे यशस्वी झाले, परिणामी महाराष्ट्रातील बौद्ध संप्रदाय इथून नामशेष झाला.. त्याचे रूपांतर वारकरी वैष्णव पंथात झाले आणी आज ते हिंदू आहेत.. तूम्ही त्यांना मानणार..? आणी ज्या बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नांने, कष्टाने, मेहनतीने आज बौद्ध धम्म पुनर्जीवित झाला आहे, तो पुन्हा या संतांच्या नादी लागून पुन्हा मुळा सहित उखडून टाकणार का..? भूतकाळात सारे संत ओरडून बुद्धाला विष्णू अवतार म्हणून महाराष्ट्रात राहिला वाचलेला बुद्ध आणी त्यांचा धम्म संपवायला निघाले होते तुम्ही पण त्यांच्या नादी लागून आज तेच करत आहात..! अंततः इथे ही हे सिद्ध झाले की संताना विठ्ठल बुद्ध आहे हे सांगायचे नसून बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे हे सांगायचे आहे.. आणी ह्या वरून पंढरपुर बुद्धांचे आहे हे ही सिद्ध होत नाही..!

★ मग आता म्हणाल कि जर संता नी म्हणलेले खोटे व कट कारस्थान आहे आणी पंढरपुर चे मंदिर हे बौद्ध विहार नाही तर बाबासाहेब पंढरपुर चे मंदिर बौद्ध धर्मीय आहे, असे का म्हणाले होते..?
तर होय बाबासाहेब १९५४ साली पूण्याच्या देहूरोड या ठिकाणी भाषणा दरम्यान म्हणाले होते की, “पंढरपूर चे देवालय बौद्ध धर्मीय आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवेन” पण बाबासाहेब असे कूठेच म्हणाले नाहीत की पंढरपुरची ती मूर्ती बुद्धाची आहे.. पुढे बाबासाहेबांनी पांडुरंग कोण हा लेख सूद्धा लिहिण्यास घेतला होता परंतु बाबासाहेबांनी तो मधेच सोडून दिलेला आहे.. कारण त्यावेळी झालेल्या संशोधनाच्या आधारे बाबासाहेबांनी पांडुरंग म्हणजे पुंडलिक आणि पुंडलिक म्हणजे पाली भाषेत कमल म्हणतात या भाषिय कडीचा त्यांनी आधार घेतला होता, पण केवळ यावरच पांडुरंग कोण आहे हे सिद्ध करता येणार नाही.. हे बाबासाहेबांना माहित होते, या व्यतिरिक्त पूरावे म्हणून बाबासाहेबांन समोर ही तूमच्या सारखे संतांचे साहित्य होते.. पण बाबासाहेब हे थोर विद्वान होते, त्यांनी जेव्हा ही संतांचे साहित्य वाचायला घेतले तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे हे सर्व संत विठ्ठलाला पांडुरंग म्हणतातच पण ते विठ्ठलाला विष्णूचा अवतार म्हणून ही म्हणतात.! मुळात लोकभावनेत विठ्ठल हा अवैदिक देव मानला गेला आहे परंतु संतांच्या साहित्यात विठ्ठल हा विष्णूच आहे हे संता नी अनेक अभंगातून अनेक प्रकारे सांगितले आहे, लोकांना पटवून दिले आहे.. बाबासाहेबांना हे कळाल्यावर त्यांनी पूढे हा विषयच सोडून दिला आहे.. कारण बाबासाहेबांना चांगलेच माहित होते की बुद्ध धम्मात अवतारवादाला काहीच जागा नाही.. आणी म्हणून त्यांनी पूढे दोन वर्षाच्या कालावधी नंतर 1956 ला धम्म दिक्षा देताना त्यांनी ज्या 22 प्रतिज्ञां दिल्या त्यातील “देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही” हे सांगणारी चौथी प्रतिज्ञा तर पाचवी प्रतिज्ञा ही थेट “बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे असे मी मानतो” हि आहे..! मला वाटते याच एका प्रतिज्ञेत आजच्या या लेखाचे संपूर्ण उत्तर लपले आहे,
      प्रत्येकाने विचार केला पाहिजे की हि प्रतिज्ञा देण्याची गरज बाबासाहेबांना का भासली असेल..? याचे उत्तर हेच संत साहित्य आहे..! ह्याच संत साहित्यातील अवतारी शब्दांमूळे बाबासाहेबांनी पांडुरंग हा विषय सोडून दिलेला आहे.. कारण बुद्ध धम्म हा अवतारा सारख्या थोतांडाच्या विरोधी आहे म्हणून त्यांनी पुन्हा पांढूरंग किंवा पंढरपुरचा उल्लेख कुठे हि केलेला नाही.. कारण त्यांनी तसा उल्लेख केला असता तर सायमन टेनिसली बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे हे सिद्ध झाले असते.. म्हणून त्या विषयात जास्त जाण्या ऐवजी उलट बाबासाहेबांनी आपल्या २२ प्रतिज्ञेत अवतारवादाचा कडाडून विरोध केला आहे..! कारण बाबासाहेबांना माहित होतं कि आपली ही एक कृती ही समाजाला वेगळ्या वाटेवर घेऊन जाऊ शकते.. म्हणून त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह करते वेळीच स्पष्ट केले होते की “हा मंदिर प्रवेशाचा हट्ट देवा साठी नव्हे तर समानते साठी आहे” मंदिरावर हक्क सांगून किंवा मंदिरात जाऊन समाजाचे प्रश्न सूटणार नाहीत..! त्यावरून बाबासाहेब कशा साठी पंढरपुरचा उल्लेख करतात हे आपण समजून घेतले पाहीजे.. तसेच जेव्हा रमाईने बाबासाहेबां समोर पंढरपुरच्या हट्ट धरला होता तेव्हा बाबासाहेबांनी त्याचा विरोध करून रमाईचे मत परिवर्तन केले होते हे ही विसरता कामा नये..! आणी आपण आज काय करतोय “प्रतिक्रांती” न ओळखता डोळे झाकून विठ्ठल हा बुद्ध म्हणून स्टेटस टाकून शूभेच्छा देतोय..? परत त्याच चिखलात उतरतोय..? पूढे येणारी पिढी यात अधिक रूळत जाऊन एक पाऊल पूढे जाईल आणी विठ्ठलच बुद्ध आहे म्हणून एकादशी चे उपवास पकडेल.. वारीत दर्शनास जाईल.. ज्या प्रकारे आपण बौद्धा पासून टप्पा टप्याने वैष्णव पंथी आणी पूढे हिंदू झालो ते परत नव्याने होईल.. परत नवी आणी सनातन्यांच्या हिताची प्रतिक्रांती होईल..! मित्रानों विठ्ठल हाच बुद्ध आहे हा नव सनातण्यांचा आरएसएस चा खोडसाळ अपप्रचार आहे.. बौद्ध समजाला हिंदूत्ववादी करण्याचा आणी त्यांना परत देव धर्मा कडे लोटण्याचा हा एक प्रयत्न आहे हे आपण समजून घेतले पाहिजे..!
      मग आता तूम्हीच सांगा तूम्ही कुणाच ऐकणार..? विविध ओव्या आणी अभंगा मधून बुद्धाने म्हणजे विष्णुने विठ्ठलाचा अवतार घेतला म्हणूण बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे हे सिद्ध करणाऱ्या संतांच की २२ प्रतिज्ञा देऊन तूमच्या आमच्या हजारो पिढ्यांचा उद्घार करणाऱ्या बापाचं..? तूम्हाला बाबासाहेब आणी त्यांचा आधुनिक बुद्ध पाहिजे की संताचा काल्पनिक अवतारवादी विष्णु (बुद्ध)..? वारकरी वैष्णव पंथात विठ्ठलाला विष्णूचे रूप मानलं गेलं आहे जे कदाचित बुद्ध अवतारा नंतर धारण केले असावे म्हणूण संत वाणीत थेट विष्णुचे नाव न घेता विष्णुचा शेवटचा अवतार म्हणून बुद्धाचे घेतले गेले आहे.. जर तुम्ही विठ्ठलच बुद्ध आहे म्हणताय तर अपसूकच बुद्ध विष्णुचा अवतार ठरतो..! 
अंततः संत वाणीचा काय उद्देश्य होता आणी बाबासाहेबांना पंढरपुर बाबत काय अभिप्रेत आहे हे इथे सिद्ध होते..!

निष्कर्ष - सारांश -
थोडक्यात काय तर आपण विठ्ठलाला जर बुद्ध आहे म्हणून सांगू लागलो तर विठ्ठल म्हणजे विष्णुचा अवतार आहे..  म्हणून बुद्ध ही अपसूकच काल्पनिक पात्र ठरते.. पण बुद्ध हे काल्पनिक नव्हे.. तर ते वास्तविक पूरूष होते ज्यांचा मानवासारखा जन्म व मृत्यु झाला आहे.. मग आपण कोणाला मानायचे..? काल्पनिक कि वास्तविक हे आपण आपल्या विवेक बुद्धि ने ठरवले पाहिजे..! जरी हे एक सत्य असले की भारतात असंख्य मंदिरे ही प्राचीन बुद्ध स्तूप किंवा विहारे नष्ट करून त्यावर उभी केलेली आहेत.. परंतु त्यामूळे आताची जी मंदिरे आणी त्यातील देव आहेत, हे बुद्धच आहेत असे म्हणता येणार नाही.. प्राचीन काळात अनेक बुद्ध स्तूप निर्माण झाले, विहार लेण्यांची निर्मिती झाली कालांतराने त्यांच्यावर अतिक्रमण ही झाले. अनेक मंदिरातील बुद्ध आणी बोद्धिसत्वाच्या मूर्त्यांचे दैवतिकरण झाले..! तर काही मंदिरात नव्याने नव्या मूर्त्या बसवण्यात आल्या, निर्माण करण्यात आल्या ज्या थेट बौद्ध नव्हत्वया तर फक्त त्यांच्या वर बौद्ध स्थापत्याचा प्रभाव होता.. त्यामूळे बुद्ध काळा नंतर निर्माण झालेले मंदिरे व दैविक शिल्प हे बुद्ध / बौद्ध आहेत असे म्हणून स्विकारणे केव्हाच योग्य ठरणार नाही.. जगन्नाथ पुरीचे मंदिर हि स्तुप नष्ट करून त्यावर नव्याने बांधलेले आहे म्हणून आता हा जगन्नाथ काही बुद्ध होत नाही.. आणी तो आमचा बुद्ध आहे म्हणून आपण त्याची पूजा ही करू शकत नाही.. आधुनिक काळात अनेक अभ्यासकांनी नेमका हाच गोंधळ केलेला आहे आणि योग्य पूरावे व संशोधन न करता त्यांनी फक्त अनेक मंदिरांवर आणी त्या ठिकाणी असलेल्या देवांवर अधिकार सांगितला आहे.. त्यांना बुद्ध करून टाकले आहे.. यात बामसेफी पूस्तके अधिक आहेत, असो काही असले तरे आपण सुज्ञ लोकांनी आपल्या बुद्धिने पूर्ण विचार करून, दोन्ही बाजू लक्षात घेऊन, बुद्धिची कसोटी लावून आपण आपले मत व्यक्त केले पाहिजे.. केवळ भावनिक होऊन किंवा कोणत्या तरी गल्लीतल्या अर्धशिक्षित लेखकाचे लिखान वाचून आपण आपले मत मांडू लागलो तर आपण चुकीच्या गोष्टी ला पाठबळ देत आहोत असे होते.. जगा समोर आपल्या समाजाचे हसू होते..! मग ब्राह्मणी लोकांनी जसा बौद्ध इतिहास दूषित केला आहे तसेच आपण हि बौद्ध इतिहास दूषित करण्यास ब्राह्मणी डोक्याला खतपाणी घालत आहोत असे होते..! विठ्ठल हा बुद्ध आहे असे आम्ही स्वीकारले आणि यासाठी आम्ही संतांचे दाखले देऊ लागलो तर आपण पूर्णपणे २२ प्रतिज्ञा डावलतो असे होते.. आपल्याला त्यांचा काल्पनिक अवतारी बुद्ध मान्य नाही तर आपल्याला बाबासाहेबांचा वास्तविक बुद्ध मान्य आहे..! आपल्याला सम्राट अशोक, सातवाहन, सम्राट कनिष्क, सम्राट हर्षवर्धन अश्या महान लोकांनी कोरलेला बुद्ध मान्य आहे.. संत लोकांनी फक्त बौद्ध धर्मावर प्रतिक्रांती करून बौद्ध धर्माला हद्दपार करण्याचे काम केले आहे अश्या संत लोकांचा दाखला एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी बौद्ध / आंबेडकरवादी समाजाने द्यावा ही लज्जास्पद गोष्ट आहे..!
      सर्वाना मान्य आहे की कधी काळी संपूर्ण देश बुद्धमय होता.. कधी काळी असेल ही त्या जागी बुद्ध विहार पण आता नाही.. वेळ काळ बदलतो तशी परस्थिती आणी भूगोल ही बदलत असतो.. मी वर उल्लेख केल्या प्रमाणे बुद्ध धम्म आणी बुद्धाच्या मूर्त्यांचे मोठ्या प्रमाणात दैवतीकरण झाले आहे, हे सत्य आहे पण म्हणूण जिथे पूरावे नाहीत अशा भूतकाळात अडकून राहणं कितपत योग्य आहे..? सोशल मीडिया वर फक्त हे आमचं आहे असा दावा करून काही मिळत नसतं.. त्यासाठी पुरातत्त्वीय सबळ, आणी सत्य पूरावे द्यावे लागतात, बाबरी राम मंदिर सारखा न्यायालयीन खटला चालवावा लागतो.. विशालगड प्रकरणा सारखं सरकार वर प्रत्यक्ष समाजाचा दबाव टाकावा लागतो.. आणी तूम्ही इथे काय करताय तर हिंदू सनातनी लोकांची बाजू मजबूत करणारे बालिश अवतारवादी पूरावे देत आहात.. थांबवा हे सगळं..! ज्या बुद्धाने अवतारवादाचा कायम विरोध केला त्याच अवतारवादाचं तूम्ही अप्रत्यक्षपणे विठ्ठलाला बुद्ध म्हणून न कळत समर्थन करताय..! फक्त बाबासाहेब म्हणाले होते पंढरपुर आपले आहे, म्हणून जर तूम्ही विठ्ठलाला मानत असाल तर मग बाबासाहेबांनी काळराम मंदिर सत्याग्रह केला होता म्हणूण येणारी पिढी रामच्या भक्तीत आणी मंदिरात गुंतून पडेल.. बाबासाहेब काय म्हणाले या त्यांच्या बोलण्या पेक्षा त्यांनी नंतर प्रत्यक्ष काय कृती केली हे महत्वाचे आहे..! बाबासाहेबांनी विठ्ठलाचा विषय सोडून देऊन आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या आणी त्यात विठ्ठल म्हणजेच विष्णु अवताराचा त्यांनी विरोध करून जाता - जाता तूम्हाला आधुनिक विज्ञानाच्या कसोट्यावर खरा उतरणारा बुद्ध धम्म दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे आणी धम्माचे पालण केले पाहिजे.. विठ्ठलाची आषाढी एकादशी साजरी करण्यापेक्षा बुद्धाची आपण आषाढी पौर्णिमा साजरी केली पाहीजे..! विठ्ठलाचे भक्ती गिते ऐकण्या पेक्षा वर्षावासात भिक्षू संघाला घरी आमंत्रित करून धम्म प्रवचन ऐकले पाहीजे.. आणी विठ्ठलाच्या शोधात पंढरपुरला चालत जाण्याच्या बाता करण्यापेक्षा दर रविवारी घरा जवळ्या बुद्ध विहारात गेले पाहीजे..! अंततः विठ्ठल कोण होता बुद्ध की अजून कोण हे ठरवून किंवा त्यावर हक्क सांगून आपल्या समाजाचे भले होणार नाही किंवा समाजाच्या समस्या ,प्रश्न ही सूटणार नाहीत.. त्यामूळे जर वर्षी तेच - तेच वायफळ वाद घालून सामाजिक वातावरण खराब करण्यापेक्षा.. आपल्या बा भिमानं, आपल्या उद्धारकर्त्या बाबासाहेबांनी दिलेली चौथी व पाचवी प्रतिज्ञा खरी आहे हे मान्य करून खरे वैचारिक बौद्ध व्हा.. देवी देवता मध्ये अडकुन अंधभक्त नाही..!
येथे मी तूम्हाला फक्त पंढरपुर आपले श्रद्धास्थान नाही हे सांगूण सोडणार नाही तर आपले मूळ ऐतिहासिक श्रद्धास्थान कोणते आहेत यांची ओळख करून देऊन तूमच्या उर्जेला खाली उपाय सांगणार आहे.. 👇
 
आपला हक्काचा वारसा जतन करण्याची गरज -
पंढरपुरचे मंदिर हे बौद्ध विहार नाही ना ती मूर्ती ही बुद्धाची नाही ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला खूप मोठ्या तार्किक चिकित्से नंतर सह प्रमाण आणी पूराव्या सहीत सविस्तर मिळाले असले, तरी या उत्तरातून एक नवीन व गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा टाकतो तो म्हणजे पंढरपुरचे मंदिर नाही तर नाही मग आपला खरा वारसा कोणता आपली खरी आद्यात्मिक धम्म स्थळे कोणती..? 
मित्रानों वर मी उत्तरात म्हणालो आहे की ज्या गोष्टीचे आपल्या कडे पूरात्तवीय पूरावे नाहीत आपण त्या गोष्टी वर वेळ आणी शक्ती खर्च करून फायदा नाही, म्हणून आपण शक्य नाही त्या ठिकाणी आपली उर्जा घालवू नये..! हे जरी खरे असले तरी ते फक्त पंढरपुर सारख्या जनसामान्याच्या प्रचंड भावना जोडलेल्या काही मोजक्याच हिंदू मंदिरांवर लागू होते.. परंतु वास्तविक पाहता या देशात आणी महाराष्ट्रात बौद्ध धम्माची अशी काही प्राथनास्थळे आहेत ज्यांचा इतिहास पंढरपुर सारखा किचकट नसून तो धडधडीत बौद्ध असल्याचे पूरावे देतो.. जो सगळ्या जगाला परिचित आहे पण खेदजनक म्हणावे लागेल की तिथे आपला समाज काही बोलत नाही.. ना त्यावर कोणी प्रश्न उपस्थित करत नाही.. ना त्या बद्दल जाणून घेण्याची धडपड करत नाही, ना प्रचार..! पंढरपुरचे मंदिर बौद्ध विहार आहे आम्ही त्याला मूक्त करू असे वक्तव्य काही आंबेडकरवादी संघटना आणी बौद्ध भिक्षु सूद्धा करतात, पंढरपुरला जाण्याचे इशारे देतात.. त्या सर्वाना माझा प्रश्न आहे कि फक्त अनुमानाच्या आधारे तूम्ही जी इतकी ताकद दाखवता.. ती तूम्ही बोधगयाच्या बुद्ध महा विहारस मूक्त करण्यासाठी का ताकद दाखवत नाहीत..? सगळ्या जगाला माहिती आहे की जिथे भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ति झाली होते असे ते बुद्ध विहाराचे ठिकान आहे.. ते बौद्धांचे आहे आणी बौद्धाने बांधले आहे..! त्या संदर्भात देश विदेशात अनेक ऐतिहासिक नोंदी, शिलालेख, स्थापत्य सर्व काही बौद्ध बाजून असताना का ते मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे..? का तूम्ही तूमची ही प्रचंड उर्जा - ताकत आणी ज्ञान तिथे लावत नाहीत..? तूमची तर भारतीय बौद्ध उपासक म्हणून पहिली जबाबदारी बनते की तूम्ही ते मंदिर मूक्त केले पाहिजे.. पण तेथे लढ़े कोणी दिले तर अनागरीक धम्मपाल सारख्या विदेशी उपासकाने..! आणी तूम्ही काय करताय तर जे सत्य नाही त्याला सत्य दाखवण्यावर जोर देताय.. का..? आणी कशा साठी.? जे आपल्या हक्काच हे ते तर तूम्ही संभाळू शकत नाही..! मग पंढरपुर कशाला हवय..? 
            दूसरे असे की घरा बाजूच्या विहाराला तूम्ही जयंती सोडलं तर कधी जात नाही आणी दूसऱ्यांच्या वास्तूवर हक्क सांगायला बरे जाता..? त्या पेक्षा ही खूप खेदजनक बाब म्हणजे महाराष्ट्रातील बुद्ध लेण्या.. हाच तूमचा खरा आणी हक्काचा सांस्कृतिक वारसा आहे..! जगाच्या पाठी वर इतका मोठा आणी समृद्ध वारसा कोणत्याच समाज्या कडे नाही जितका तूम्हा आम्हाला बौद्ध म्हणून आपल्या पूर्वजाकडून मिळाला हे..! त्यावर आपण आपला हक्क कधी सांगणार आहात? अतिक्रमणातून त्याला कधी मूक्त करणार आहात..? जे आज ही आहे त्याचे संरक्षण कधी करणार..? 

मित्रानों महाराष्ट्रात आपला वारसा म्हणता येईल अशा तब्बल 900 बुद्ध लेण्या अस्तित्वात आहे..! ज्या या देशातल्या तथाकथित मंदिरांपेक्षा किती तरी पटीने प्राचीन आणी सौंदर्य संपन्न व इतिहासाने भरपूर आहेत.. पण आज आपल्या दूर्लक्षा मूळे त्या 900 पैकी 400 लेण्या ह्या अतिक्रमित झाल्या आहेत.. पंढरपुर पेक्षा आपण तिकडे लक्ष दिलो तर ते अतिक्रमणे काढली जाऊ शकतात.. तिथे पंढरपुर सारखी परिस्थिति नाहीये, तेथे सगळी बाजू आपल्या बाजूने खंबीर आहे..! आज घडीला महाराष्ट्रातील काही महत्वपूर्ण प्राचीन बुद्ध लेण्यांचा विचार केला तर.. 
१)जगातली सर्वात सूंदर लेणी म्हणून जिचा उल्लेख केला गेला आहे त्या कार्ला लेणी च्या तोंडावरच एकवीरा देवी बसवली आहे..
२) जून्नर जो प्राचीन बौद्ध बहूल प्रदेश होता जिथे सगळ्यात जास्त लेण्या आहेत तेथील कपिचीत (लेण्यांद्री) लेणीत अष्टविनायकाचा गणपती बसवला आहे.. मानमुकडा लेणीत अंबाबाई बसवून लेणीच नावच अंबा अंबिका करण्यात आले आहे..!
३) पूण्याच्या जवळ असणार्या घोराडेश्वर बुद्ध लेणी मध्ये शंकर तर चाकण च्या लेणीत फिरंगाई देवी बसवली आहे..
भालचंद्र आणी भंडारा लेणीत विठ्ठल आणी तूकाराम बसवला आहे.. 
३) कराडच्या आगाशिव लेण्यांच्या एका मोठ्या गटा मध्ये तर चक्क बुद्ध स्तूपासमोरच कूठे विठ्ठल मंदिर तर कूठे शिव मंदिर बांधले आहेत..
४) सातारा वाई च्या पालपेश्वर बुद्ध लेणी मध्ये एक पाऊल पूढे टाकून चक्क बुद्ध प्रतिक असलेल्या स्तूपालाच काळा रंग लावून स्तूपालाच शिवलिंग बनवण्यात आले आहे..
५) शिरवळ बुद्ध लेणीत स्तूपा समोर सिमेंट चे नवे शिवलिंग बांधण्यात आले आहे..! 
७) तर गोमांशी बुद्ध लेणीतील बुद्धाच्या धडधडीत स्पष्ट मूर्ती ला स्थानिक लोक आदिवासी बाबा म्हणून पूजतात...
      या शिवाय अशा अनेक बुद्ध लेण्या आहेत ज्यांची नावे इथे सांगत बसलो तर लेख प्रचंड मोठा होईल.. ह्या सगळ्या अतिक्रमण झालेल्या लेण्या आपण बुद्ध लेणी असल्याचे धडधडीत आणी स्पष्ट पूरावे देतात, असे असताना ही आज त्या हिंदू अतिक्रमणात आहेत..! त्यात बुद्धा ऐवजी आज विविध काल्पनिक देव बसवले गेले आहेत.. बुद्ध लेणी ला मंदिर बनवण्याचे लाख प्रयत्न झाले तरी तितले शिलालेख, ऐतिहासिक नोंदी आणी स्थापत बुद्ध धम्माचे सत्य सांगतात.. त्यावर का कोणी बोलत नाही.. का त्याचे स्टेटस ठेवले जात नाहीत..? का यावर आंबेडकरवादी संघटना आणी भिक्षू संघ अशा लेण्या बाबतीत मूंग गिळून शांत आहे..?
           असो मित्रांनो आपल्या याच निष्काळजी आणी दूर्लक्षा मूळे आपण विरारच्या जिवदानी सारख्या अनेक बौद्ध लेण्या आपल्या हातातून गमावल्या आहेत.. त्यानंतर वरील काही लेण्या अतिक्रमण मजबूत करण्याच्या वाटेवर आहेत.. तसे झाले तर त्याही आपल्या हातून कायमच्या जातील, तर ऐनारी लेणी, नाशिक च्या त्रिरशमी ज्याला पांडव लेणी म्हणतात, लोणवळ्या ची भाजा लेणी अशा अनेक लेण्या आहेत ज्यात आता सध्या हया घडीला नव्यावे अतिक्रमण करण्याचे प्रयत्न ह्या सनातनी लोकां कडून होत आहेत.. त्यांना थांबवणे अत्यंत गरजेचे आहे..! आपली एकजूट झाली तर ह्या लेण्या अतिक्रमणातून 💯 मूक्त होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे मूंबईची काण्हेरी लेणी जी काही दशका पूर्वी शिव भक्ता कडून अतिक्रमण करून तिथे महाशिवरात्रि केली जात होती, ती आज आपल्या सूज्ञ धम्मबांधवा मूळे मोकळा श्वास घेऊन आज तिचे संवर्धनाचे काम जोरदार चालू आहे.. त्या संवर्धना मूळे आता ती लेणी आपल्या पूढच्या पिढीला पाहण्यासाठी सूरक्षित झाली आहे..!

अजून ही वेळ गेलेला नाही.. जे आपले नाही.. आपल्या जवळ नाही त्यावर हक्क सांगत बसण्यापेक्षा जे आपले आहे आपल्या हाताले आहे ते जपणे खूप गरजेचे आहे.. नाही तर आपल्या आपली येणारी पिढी माफ करणार नाही.. म्हणून पंढरपुर आमचे, तिरूपती आमचा म्हणण्या पेक्षा.. ह्या जागतिक दर्जाचा वारसा असणाऱ्या बुद्ध लेण्या आमच्या अभिमानाने म्हणा.. मंदिरा साठी लढण्यापेक्षा लेणी अतिक्रमण रोखण्यासाठी, अतिक्रमण मूक्त करण्यासाठी लढा.. आज घडीला फेसबुक, वॉट्सअप वर असे अनेक ग्रूप हा लेणी कार्या साठी कार्यरत आहेत त्यांना जॉईन व्हा..! पावसाळ्यात कोणत्या तरी साधारण डोंगरा वर जाण्यापेक्षा बुद्ध लेणी असलेल्या डोंगरा वर पर्यटना साठी जा.. जिथे तूम्हाला डोंगर, धबधबे सोबत आपला इतिहास ही दिसेल.. आणी बौद्ध लेण्या वरील पर्याटन ही वाढेल ज्यामूळे त्या लेण्यांचे संवर्धन ही होईल.. बौद्ध पर्यटन वाढल्याने पवित्र लेणी वरील गैरकृत्यांना ही आळा बसेल.. आणी सर्वाना आपला इतिहास ही कळेल.. म्हणून नको त्या जागी गूसपेट करण्या ऐवजी आपल्या हक्काच्या प्राचीन वारशा साठी हक्काने लढा.. सह परिवार बुद्ध लेणीचे पर्यटन करा, पिकनिक काढा.. आणी स्वत: सोबत आपल्या येणाऱ्या पिढीला सूद्धा आपल्या खऱ्या इतिहासाची ओळख करून द्या..!

जय भिम ☸️ नमो बुद्धाय
             
                ✍️ लेखन / संकलन - दSuryawanshi

🛑 आमच्या सोबत संपर्क साधण्यासाठी खालील लिंक्स चा वापर करा.. व ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा..!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture