mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture


तथाकथित गजलक्ष्मी चे सर्वात प्राचीन शिल्प शोधायचा तूम्ही प्रयत्न केला तर तूम्हाला बौद्ध लेण्या मध्ये जावे लागेल.. गजलक्ष्मी चे शिल्प सर्वप्रथम सांची आणी भारहूत  स्तूपा वर दिसेल त्या नंतर महाराष्ट्र मध्ये पितळखोरा ह्या अद्य लेणी मध्ये नंतर रायगड च्या ठाणाळे व जून्नर च्या भूत लेणी मध्ये गज लक्ष्मी चे शिल्प आढळून येतात.. आता तूम्ही म्हणाल बुद्ध लेणी मध्ये गज लक्ष्मी चे शिल्प कसे काय तर मूळात गजलक्ष्मी म्हणजेच महामाया भगवान गौतम बुद्धा ची आई आहे.. कारण गज म्हणजे हत्ती आणी बौद्ध धम्मात हत्ती ला खूप महत्व आहे बुद्धा च्या जन्मा आधी महामाया चे स्वप्ना मध्ये सफेद हत्ती चे वर्णन आहे.. या संदर्भात डॉ ग.ह.खरे त्यांच्या "स्वराज्यातील तीन दूर्ग" या पूस्तकात लिहतात की भगवान बुद्धा च्या जन्मा नंतर दोन श्रेव्त हत्ती ने बुद्धा च्या आई चा अभिषेक केला होता हीच घटना बौद्ध धम्मात अनेक लेण्या मध्ये कोरला आहे.. भारतीय उपखण्डात शिल्पकला व मूर्ति कला हि गांधार बौद्ध कले ची देन आहे हे सर्वश्रूत आहे च भारतात सर्वात प्रथम बुद्धा च्या मूर्ति बनवण्यात आल्या.. छत्रपती शिवाजी महाराज विश्वविद्यालय कोल्हापुर चे जेष्ठ इतिहास प्रोफेसर आणी महाराष्ट्र सरकारचे अनेक पूरस्कार भूषवनारे  डॉ.अ.ह.साळूंखे त्यांच्या "सर्व श्रेष्ठ भूमि पूत्र" या पूस्तकातात लिहतात आज काल जे बुद्ध लेण्या व्यतिरीक्त गजलक्ष्मी चे शिल्प प्राचीन गावे किवा गड किल्लें च्या परीसरात दिसतात ते फार प्राचीन नसून 9 व्या ते 16 व्या शतकातील आहेत.. पूरातन तज्ञ मार्शल त्यांच्या  "ए गाईड टू सांची" या संशोधन प्रबंधा मध्ये स्पष्ट लिहतात की सांची च्या पश्चिम तोरणद्वारा वर जे शिल्प आहे ते महामायेच आहे.. स्थानिक लोक त्याला गजलक्ष्मी म्हणतात.. परंतु ते जरा ही विचार करत नाहीत कि बौद्ध स्तूप व लेणी मध्ये जिथे सर्व शिल्प बुद्ध आणी त्यांच्या जिवना संबंधीत असताना एकमेव शिल्प महामायेच का असावं..? या शिवाय फूशर व मूजमदार या पूरातन इतिहासकारां नी सूध्दा हे कबूल केले आहे.. सफेद हत्ती चे उल्लेख कोणत्याच हिंदू धर्म ग्रंथात सापडत नाही.. या शिवाय गजलक्ष्मी चा जन्म कसा झाला..! याचे स्पष्टीकरण कोणत्याच बामनी धर्म ग्रंथात नाही.. या उलट सफेद हत्ती असो वा कमळ पुष्प बौद्ध धम्मात किती महत्वपूर्ण आहे हे 2000 वर्ष जूण्या बौद्ध कालीन कोणत्या ही वास्तू मध्ये पाहू शकता वा देश विदेशा च्या विविध भाषीय प्राचीन ग्रंथा मध्ये ते वाचू ही शकता.. अतः हे स्पष्ट होत आहे की आज जे मंदीरा मध्ये दूकाना मध्ये शूभ कार्या मध्ये किंवा लक्ष्मीपूजन  म्हणूण ज्या गजलक्ष्मी ला पूंजल जातं ती दूसरी तिसरी कोणी नाही बुद्धा ची आई आहे.. 

मित्रांनो आपणा ला माहीतच आहे की बुद्ध हा विष्णु चा 9 वा अवतार आहे म्हणून हिंदू धर्म ग्रंथात स्पष्ट भेसळ करत बुद्धाला देव म्हणूण चोरी केली आहे.. जेव्हा की बुद्ध स्वत: ला कधीच देव म्हणूण घेत नसत.. या शिवाय हिंदू धर्माची जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था भेदभाव आणी तोथांड असणारे ग्रंथ सूध्दा बुद्धा नी नाकरले आहेत.. विचार करा जर बुद्ध विष्णु चा अवतार असता तर का म्हणूण त्यांनी मी देव नाही, देव नसतो, देव मानू नका.. असे म्हणत स्व:ता च्या धर्मांची चिकित्सा केली असती.. सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की बुद्धा ला जसे विष्णु चा अवतार सांगतले जाते तसेच बुद्धा च्या आई महामाये ला गज लक्ष्मी म्हणूण सांगतले जाते..चारी वेदा मध्ये कुठेच मूर्ती पूजा चा उल्लेख मिळत नाही. कारण वेदीक लोक निसर्ग पूजक होते बौद्ध सम्राट कनिष्क च्या काळात प्रथम गांधार आणी मथूरा मूर्ती कलेचा उदय झाला त्या कलेत सर्व प्रथम बुद्ध त्यांच आयूष्य घडवण्यात आले तसेच महायान वज्रयान व तंत्रयान ह्या बौद्ध कल्पनेतील अनेक बौध्दीसत्व कोरण्यात आले.. कालंतराने बौद्ध धम्म लोप पावत गेला व त्या जागी आले ल्या हिंदू धर्माने त्या शिल्पा संबंधित कथा रचून त्यांना स्वधर्मी करून टाकले.. यांचे उत्तम उधारण म्हणजे लेण्यांद्री व कार्ले अंबा अंबिका तूळजा ह्या बौद्ध लेण्या मध्ये आज ही हिंदू धर्माचे अतिक्रमण पाहयला मिळते..!

संदर्भ सूची.. 
1) समग्र बौद्ध इतिहास 
2) पूरातन तज्ञ नोंदी
3) प्रत्यक्ष लेणी भेट
4) लेखात नमूद लेखकांची ऐतिहासिक पूस्तके

    ★जागतिक वारसा बौद्ध स्थळ सांची येथील शिल्प★

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti