The Face Of Buddhist Terror | बुद्धाचे अहिंसा तत्व व बौद्ध देशाचा आंतकवाद की अस्तित्वाची लड़ाई | Buddhism

☸️ म्यांमार व श्रीलंका सारख्या बौद्ध देशातील भिक्षु गेल्या काही वर्षा पासून त्यांच्या देशात वाढती मुस्लिम लोकसंख्या व त्यांच्या अत्याचारा पासून देश व धम्म टिकवण्यासाठी रोहिंग्या मूस्लिमा ना देशा बाहेर खदाडत आहेत.. त्यामूळे लाखो लोक म्यांमार सोडून बांग्लादेश मध्ये जात आहेत त्यामूळे स्व:ता च्या सिमा बंद करून घेणारी अमेरिका , जागतीक संघटना व जगभरातील लोक त्या बौद्ध भिक्षु ना अहिंसा चा पाठ शिकवत आहेत ज्यांनी जगाला सर्व प्रथम अहिंसा व विश्वशांति चा मार्ग दाखवला.. टाईम सारख्या जागतिक मासिकाने तर याला बौद्धांचा दहशतवाद असं ठरवलं आहे.. याचा समाचार व उत्तर देणारा हा लेख..

आज जगभरात मुस्लिम लोकसंख्या झपाट्या ने वाढत आहे आणी ते इतर धर्मियांना धोका ठरत आहेत.. सौदी अरेबिया सारख्या कट्टर मुस्लिम देशात जर इतर धर्माचे लोक काफीर म्हणूण राहू शकत नाहीत.. तसचं इतर धर्मिय देशानी ही तेच धोरण स्विकारलं तर त्यात टिका करण्यासारखं काय आहे..  म्हणजे देश धर्म फक्त मूस्लिमा ना असतो का..? इतरांना आपल्या देश धर्म संस्कृति चे पालन करण्याची मुभा नाही का.. अफगानिस्तान पाकिस्तान तुर्की सारख्या किती तरी देशात इस्लामतर लोकांचा नुस्ता छळच नाही तर त्यांना संपवलं सूध्दा जातं.. म्हणूण या अहिंसा प्रिय बौद्ध देशा नी स्वधर्म व देशासाठी हिंसाप्रिय रोहिंग्या मुस्लिमान चा प्रतिरोध केला तर त्यांच्या देशावर व बौद्ध धम्मावर टिका करण कितपत योग्य..? असं करणाऱ्या देशानी आधी स्व:ता खालचा अंधार पाहावा..आता पाहूया बुद्ध धम्माच हिंसे वर काय मत आहे बुद्ध काय सांगतात..!

🔴 म्यांमार मध्ये हिंसे चा आतंकवाद करणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमाना नी मारलेले बौद्ध भिक्षु व बलात्कार केलेल्या बौद्ध मूलींचे फोटो लावलेले हे बुद्ध विहार..
🤔 अहिंसावादी असणे म्हणजे अत्याचाराचे बळी होणे असे आहे का ? बुद्धांचा सिद्धांत नेमका काय ?

💁‍♂️ अहिंसेच्या सिद्धान्तावर टीकाकारांचे म्हणणे असे असते की, अहिंसेचे पालन करणे म्हणजे अन्याय व अत्याचाराला शरण जाणे होय. पण तथागतांनी शिकविलेल्या अहिंसा तत्त्वाचा हा पूर्णतः विपर्यास होता. सिंह सेनापतीला उपदेश देताना तथागतांनी स्पष्ट केले होते की, जो दंडनीय आहे, त्याला दंड मिळायलाच पाहिजे. जो आपल्या अपराधाचा दंड भरतो, त्याला तो स्वतःच जबाबदार असतो. आपल्या अकुशल कर्माच्या परिणामामुळे तो दंड भोगतो व न्यायधीश आपले केवळ कर्तव्य म्हणून दंडाची शिक्षा फर्मावितो. जेव्हा दंडनीय व्यक्तीला समजेल की, त्याचा दंड त्याच्या कर्माचेच फळ आहे, तेव्हा त्याला दंड भोगतांना दुःख न होता पश्चात्ताप होईल. तथागतांच्या उपदेशात अहिंसेला मुख्य स्थान आहे, परंतु ती निरपेक्ष नाही.

🧐 अहिंसेबाबत बुद्धांचे म्हणणे काय ते समजून घ्या : बुद्धांनी शिकविले की, पापाला पुण्याने जिंकावे. परंतु जर चांगल्या गोष्टीचा पापामुळे नाश होणार असेल तर अशा पापाला नष्ट करण्यासाठी हिंसेचाही आश्रय घ्यावा लागल्यास ते त्यांना अमान्य नव्हते. भगवंतांनी श्रेणीय बिंबिसाराला असे स्पष्टपणेच उत्तर दिले की, अहिंसेच्या नावाखाली सैनिकांनी आपल्या देशाप्रती त्यांचे जे कर्तव्य आहे, त्यापासून विन्मुख होऊ नये. त्यांनी संघासमोर अशी घोषणा केली की, राज्याच्या कोणत्याही सैनिकास प्रव्रज्या देण्यात येऊ नये.

🔍 अहिंसेबाबत चुकीचे गैरसमज आणि बुद्धांचा नेमका दृष्टीकोण असा..

● अहिंसा किंवा जीवहिंसा न करणे, हे भगवंतांच्य धम्माचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. अहिंसेचा करुणा व मैत्रीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. 

● परंतु प्रश्न असा आहे की, ते केवळ ‘शील’ होते की तो एक नियम होता? अहिंसेला निरपेक्ष असे बंधन मानल्यास, अहिंसेमुळे वाईटासाठी चांगुलपणाचे बलीदान करावे लागेल, किंवा दुर्गुणासाठी सद्गुणांचे.

● श्रीलंकेमधील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमणकर्त्यांवर तुटून पडले व त्यांनी लोकांनाही लढावयास उद्यत केले. 

● दुसरीकडे ब्रह्मदेशातील भिक्खूनी तसे करावयास मनाई केली व तो देश परतंत्र झाला होता. ब्रह्मदेशातील लोक अंडी खातात, परंतु मासोळी खात नाहीत. 

● काही दिवसांपूर्वी जर्मनीमधील बौद्ध समितीने असा प्रस्ताव केला की, पंचशीलांपैकी ते प्रथम शील सोडून केवळ चार शिलांचेच पालन करतील. 

● परंतु भगवंतांनी अहिंसेला शील (Principle) म्हणून ग्रहण केले , नियम (Rule) म्हणून नाही. त्यांनी अहिंसेला जीवनाचा एक मार्ग मानले. 

● म्हणून जेथे सद्गुणांचा बचाव करावयाचा असेल व हिंसेशिवाय ते शक्य नसेल, तेथेच नाइलाज म्हणून हिंसा करावी लागेल, असा उपदेश करतांना भगवंतांनी प्रज्ञासंगत फारच उत्तम शिकवण दिलेली आहे.

सारांश :- बौद्ध धम्मचे दुःख मूक्ति हे उद्दिष्ट आहे.. आणी दुःख मूक्त होण्यासाठी अहिंसा.. अहिंसा एक शील आहे कठोर नियम नव्हे.. बौद्ध धम्म हिंसे पासून अलिप्त राहण्यास शिकवतो षंढ होण्यास किंवा अत्याचारास शरण जाण्यास नाही..! बौद्ध धम्म खूप विचार व वैज्ञानिक दृष्टिकोणा तून बनला आहे त्यांच्या सारख तत्वज्ञान व समतोल (balance) इतर धर्मात सहसा पहावयास मिळत नाही आणी म्हणूण बुद्धाच्या शिकवणी ला मध्यम मार्ग म्हणतात.. ना जास्त अहिंसा ना जास्त हिंसा.. सत्य पूण्य व अस्तित्व ठिकवण्यासाठी वेळप्रसंगी हाती तलावर घेण्यास ही बौद्ध धम्म शिकवतो..!

रोहिंग्या मुसलमाना च्या अत्याचार विरोध करणारे म्यांमार नागरीक..
श्रीलंका सारख्या बौद्ध राष्ट्रानी दिलेला पाटींबा
🔴काय आहे म्यांमार प्रकरण पाहा खालील विडियो मार्फत..?


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture