Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

तूम्हाला माहित आहे का..? वाचा “नाला सोपारा स्तूपाची बुद्ध जयंती आणी बाबासाहेबांचा इतिहास”

मित्रानों.., 
आज तूम्हाला बुद्ध पौर्णिमा आणी नाला सोपाऱ्याच्या त्या आपल्या इतिहासाची ओळख करून देणार आहे.. ज्यांचे ऐतिहासिक व पवित्र महत्व ओळखून खूद्द बाबासाहेब तेथे बुद्ध जयंती साजरी केली होती..बाबासाहेबांना आपन बुद्ध धम्माचे प्रवर्तक मानतो.. कारण त्यांनीच या देशात विस्मृत झालेल्या बुद्ध धम्माचे धम्मचक्र गतीमान केले.. पण तूम्हाला माहिती आहे का..? कि बुद्ध धम्माच्या प्रवर्तका सोबतच बाबासाहेबांना बुद्ध जयंती चे प्रणेते म्हणून ही ओळखलं जातं..! कारण, हाजारो वर्षा नंतर या भारत भूमि मध्ये बुद्धाची सार्वजनिक जयंती साजरी करणे बाबासाहेबांनी सूरू केले होते..1950 साली त्यांनी प्रथम दिल्ली येथे 20 हजार लोकां सोबत बुद्ध जयंती साजरी केली.. अशाच एका म्हणजेच 9 मे 1955 च्या बुद्ध पोर्णिमेला स्वत: बाबासाहेब आंबेडकर यांनी नालासोपाऱ्या च्या प्राचीन स्तूपास भेट देऊन बुद्ध जयंती साजरी केली होती..! चला पाहूया काय आहे तो इतिहास..,
                   ऐतिहासिक सोपारा बुद्ध स्तूपाच

🌟 नालासोपारा स्तूपाचा निर्मिती इतिहास..
प्राचीन काळात सुनापरंत, सुप्पारक, सोपारक,सोपारा असे अपभ्रंश होत होत आज आपण त्याला नाला सोपारा असे म्हणतो. 2500 वर्षा पूर्वी बुद्ध काळात ते एक जागतिक किर्तीचे बंदर होते, मोठ मोठे व्यापर तिथून चालायचे, तिथेच एक श्रीमंत चंदनाचा व्यापारी होता ज्याला प्राचीन बौद्ध ग्रंथा मध्ये #पुण्ण (पूर्ण) असे संबोधले आहे.. हा व्यापारी एकदा मलबार प्रांतात व्यापार करत असताना उत्तर भारतातून आलेले व्यापारी सुंदर अर्थपूर्ण गित गात असलेले पाहून त्याने विचारले तूम्ही हे कसले गीत गाताय..? तेव्हा त्याला समजलं कि हे गीत नसून भगवान बुद्धाच्या गाथा आहेत वंदना आहेत..! हे एकून प्रभावित झालेला पूर्ण श्रावस्तीला बुद्धाचा धम्म जानून घेण्यासाठी गेला.. बुद्ध धम्माचे तत्वज्ञान ऐकून मनप्रसन्न झालेला पूर्णाने धम्माची दिक्षा घेऊन काही दिवस तिथेच राहून परत सोपाऱ्याला येत असताना त्यांने आठवण आणी धम्मप्रचारा साठी म्हणून बुद्धाकडून त्यांचे भिक्षापात्र मिळवले व तो सोपाऱ्याला पोहचला.. पूढे त्याने त्या भिक्षापात्रावर चंदनाचा स्तूप बनवला.. बुद्ध जिवंत असताना त्यांच्या भिक्षापात्रावर बांधलेला हा पहिला पारीभोगिक स्तूप आहे.. काही प्राचीन ग्रंथ आणी आख्यायिका नूसार बुद्ध स्वत: आपल्या 500 भिक्षु संघा सोबत नाला सोपाऱ्याला आले होते व या परिसरात त्यांनी काही काळ विहार केला होता म्हणून नालासोपारा जवळच्या परिसराला विहार असे ओळखले जाऊ लागले ज्याला आज आपण विरार असे म्हणतो..

.                        नालासोपारा शिलालेख 

🌟 सम्राट अशोक आणी नालासोपारा
बुद्धाच्या शेकडो वर्षानंतर नाला सोपारा हि चक्रवर्ती सम्राट अशोकाची प्रांतीक राजधानी म्हणून उदयास आली.. या काळात बुद्धच्या प्रभावात आलेल्या आशोकाने या जागे चे ऐतिहासिक प्राचीन महत्व ओळखून या बुद्ध स्तूपाचे पुनर्निर्माण केले.. तसेच यांच सोपारा बंदरातून धम्माचा जगात प्रचार प्रसार झाला होता..

🌟 नालासोपारा स्तूपाचा शोध आणी उत्खनन
 एप्रिल 1882 ला भगवानलाल इंद्रजी यांने सर्वप्रथम सोपारा स्तूपाचे उत्खनन केले त्यात त्यांना पाषण, सोने आणी चांदी चे करंडक सापडले ज्यात अनुक्रमे हिरे रत्न व सोन्याची धम्म प्रतिके, बुद्ध मुर्त्या, आणी शेवटी भिक्षापात्राचे तूकडे होते.. तसेच याच परिसरात त्यांना सम्राट अशोकाचा 8 वा शिलालेख ही मिळाला.. जो आज ही तूम्ही मुंबई फोर्ट च्या छ. शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयात पाहू शकता तसेच उत्खननातून मिळालेली भिक्षा पात्राची प्रतिकृती एशियाटिक सोसायटी च्या ग्रंथालयात पाहू शकता..!

           सोपारा उत्खननातून मिळालेली अस्थि कलश

🌟 बाबासाहेब आणी नालासोपाऱ्यी बुद्ध जयंती
नाला सोपाऱ्याचा हाच बुद्ध ते सम्राट अशोका पर्यंतचा दैदीप्यमान इतिहास बाबासाहेबांना माहित होता.. व या जागेचे ऐतिहासिक महत्व व पावित्र्य त्यांना माहिती होते म्हणूनच त्यांनी ९ मे 1955 ची बुद्ध जयंती स्वत: सोपारा स्तूपा जवळ उपस्थित राहून साजरी केली होती..!

१९५५ ची बुद्ध जयंती बाबासाहेब आणी सहकारी - सोपारा

🌟 माझी भेट आणी 2023 ची बुद्ध जयंती
अशा या ऐतिहासिक व दोन्ही महापुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर 5 मे 2023 रोजी बुद्ध पौर्णिमेस मी भेट देऊन इतिहासाची साक्षात ओळख करून घेतली.. कारण बाबासाहेब म्हणतात जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाहीत..! 

          बिंबीसार भदरगे, सूशांत जगताप व दत्ता सुर्यवंशी 

🌟 अहवान 
 माझ्या मुंबई परिसरातील सर्व श्रद्धावान धम्म उपासक, उपासिका तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक व समाज बांधवाना विनंती करतो कि ज्या प्रमाणे बाबासाहेबांच्या पावला वर पाऊल ठेवत तूम्ही भिमा कोरेगांव शौर्य दिवस, चवदार तळे सत्याग्रह दिन, महापरिनिर्वाण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करता.. बाबासाहेब जिथे जिथे गेले तिथे जाता.. तसेच या बुद्ध पौर्णिमे पासून संकल्प करा की सह परीवार नाला सोपाऱ्याच्या पवित्र बुद्ध स्तूपास भेट देऊन तूमची जयंती साजरी कराल..! तूमची एक भेट या मरणासन्न अवस्थेतील स्तूपास पुनर्जन्म देऊ शकते.. स्तूपाचे संवर्धन करण्यास सरकार ला भागू पाडले जाऊ शकते.

🌟 टिपा - स्तूप म्हणजे काय..?
स्तूप म्हणजे बुद्ध रूप होय.. प्राचीन काळात जेव्हा मुर्ती कलेचा शोध लागला नव्हता तेव्हा बुद्ध म्हणून स्तूपाची पूजा आरचा केली जात होती.. अर्हंत भिक्षूच्या स्मरणार्थ त्यांच्या राखेवर स्तूप उभारावा व त्याची उपासना करावी असे स्वत: बुद्धाने सांगितले होते..!
🌟 लोकेशन लिंक

🌟 Channel link

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture