Parbhani Violence | परभणी चे संविधान प्रकरण आणी संयम, स्व:नियंत्रण हरवलेला आंबेडकरी समाज | एक कडवट आत्मचिंतन आणी प्रशासकीय कारवाईचे परिक्षण



★ भाग - एक :- कडवट पण सत्य, समाजाच्या कृत्याचे आत्मचिंतन 

10 डिसेंबर 2024 ला परभणी मध्ये जे संविधान विटंबना प्रकरण झालं त्या नंतर संतप्त संविधान प्रेमीनी तत्काळ न्याय करत आरोपी ला चांगलाच चोप दिला आणी त्याला पोलिसांच्या हावाली सूद्धा केलं.. त्या नंतर ही दूसऱ्या दिवशी सदर घटनेचा निषेध म्हणून कडकडीत बंद केला त्या प्रतिसाद ही मिळाला मग तो शांततेत चालू असताना अचानक दूपारी उद्रेक करत जाळफोळ, दगडफेक, लोकांच्या मालमत्तेचे नूकसान करण्याचे काय कारण, काय साध्य झालं त्यातून..? आज सोशल मीडिया वर समाज माध्यमांवर समाजाची बदनामी करणारे कित्येक विडियो क्लिप्स फिरत आहेत ज्यात झेंडे घेऊन गोरगरिबांच्या मालमत्तेचे नूकसान करताना आपले तरूण दिसतायत ते विडियोस इतर समाजाची लोक रगंवून प्रदर्शित करत आहेत त्यातून समाजा चा पराक्रम किंवा रोष तर दिसत नाही उलट हूल्लड तरूण आणी अशिक्षित लोकांच प्रदर्शन दिसत आहे..! हे कितपत योग्य आहे..?
 एखाद प्रकरण आपण कसं हाताळाव हे कधी आपल्याला कधी कळणार..? एका समाजकंटकाची ची सजा पूर्ण समाजाला का..? महाड च्या सत्याग्रहा वेळी सूद्धा जातीवादी लोकांन कडून दगडफेक आणी अमानुष मारहाण झाली होती हवं तर बाबासाहेबांनी आदेश दिला असता तर आपल्या लोकांनी महाड च नामोनिशान मिटवलं असतं, पण बाबासाहेबांनी सगळ्याना समंजसपणा व धीराने घेण्यास सांगितले आणी योग्य विरोध दर्शवून त्यांनी पूढे सर्व आरोपीनां कायदेशीर धडा शिकवला..! मग आपण का त्यांच अनुसरण करत नाही..? दर वर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिवासाला करोड़ों ची पूस्तक विकत घेणारा समाज म्हणून मिरवतो मग त्या पूस्तकातील ज्ञान आणी बाबासाहेब डोक्यावरून डोक्यात कधी घेणार..?


हा जर एखाद्या वेळी प्रकरण भिमा कोरेगांव सारख तिव्र असतं, लढाई कोणत्या समाजा विरूद्ध किंवा विचारधारे च्या विरूद्ध असती तर गोष्ट वेगळी असती, आरोपी मोकाट असते तर गोष्ट वेगळी असती, पण तसे काही कारण नसता ना, फक्त एक आरोपी आणी तो पण ताब्यात असता ना कोणी तरी येतं, विना कारण भडकावतं, आणी आपण लगेच पेटून उठतो.. बरोबर आहे का..? रमाबाई नगर प्रकरणात काय झालं ते सगळ्याना माहित असताना ही परत परत त्याच चूका आणी तेच मनुवादी सत्तेच्या कटाला बळी पडणं, हे कूठे तरी थांबलं पाहिजे.. एकी कडे आपण स्वत:ला बौद्ध म्हणून घेतो आणी दूसरी कडे एखाद्या प्रकरणाची अतिशयोक्ति करून अनावश्यक हिंसे वर उतरतो..? हे बरोबर नाही..

मान्य आहे कि बाबासाहेब, संविधान आपल्या अस्मितेचे विषय आहेत पण प्रत्येक वेळी भावनेच्या भरात वाहून जाणे चूकीचे आहे..! जो पर्यंत एखादे प्रकरण कायदेशीर आणी शांततेच्या मार्गाने हताळता येईल तो पर्यंत ते शांततेत हाताळले पाहिजे, हिंसा ही कोणत्या हि प्रकरणाची शेवटची पायरी असते.. ! आणी तरी ती करूण काही प्राप्त होत नाही.. मान्य आहे लोकाच्या मनात राग होता त्यानी आरोपी ला खूप चोप पण दिला, धडा शिकवला पण पूढे निष्पाप लोकांच जे नूकसान केलं ते जरा ही समर्थनीय नाही.. एखादा शिक्षित समाज कधीच त्याच समर्थन करू शकत नाही..! 


कारण शेवटी रमाबाई असो वा परभणी होतं काय..? तर त्यातून फक्त समाजाच नाव बदनाम आणी हाजारो तरूणांवर केस / खटले दाखलं होतात जे पूढचे दहा बारा वर्ष त्यांना त्रास देतात आणी समाजाच्या भावी पीढ़ी व आर्थिक दृष्ट्या स्थिति बिघडण्यास आणी त्यांना अधोगतीस कारणीभूत ठरतात..!

                           ...✍️दsuryawanshi

★ भाग - दोन :- प्रकरणाची सध्य स्थिती आणी लक्षात घेण्यासारख्या शंका व उपस्थित प्रश्न..?

१)  परभणी मध्ये जे घडलं किंवा त्या नंतर जे आता घडत आहे त्या सर्वात विचार करण्यासारखे काही मूद्दे आणी प्रश्न आहे ते म्हणजे हे सर्व सुनियोजित कट असल्याचे जाणवते त्याचे कारण म्हणजे कोणत्या तरी गोष्टी वरील लक्ष भटकवण्यासाठी किंवा कसला तरी बदला घेण्यासाठी हे सर्व प्रशासनाला हाती धरून चालू आहे का असा प्रश्न पडतो..? कारण सध्या महाराष्ट्रात ईवीएम विरोधी वातावरण जोर धरत आहे.. त्याच वेळी राज्यात भाजप ला जो लोकसभेला मोठा फटका बसला होता तो याच संविधान प्रेमी लोकां मूळे संविधान बदलण्याच्या प्रचारा मूळे बसला होता.. त्यावेळी  विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शांत बसलेला संघ परिवार आता राज्यात संपूर्ण ताकदीने परत सत्तेत येताच अशा घटना घडतात, बरं महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजप शासित सरकार आणी त्यांचा मूख्यमंत्री होतो तेव्हा तेव्हा जातीय द्वेष आणी दंगली का होतात हा निव्वळ योगायोग म्हणावा का..? 2018 ला भिमा कोरेगांव आणी आता #परभणी प्रकरण..? देवेन्द्र फडणवीस हे मुख्यमंत्री होताच दंगली का होतात..?  महाराष्ट्राच मूख्यमंत्री पद आणी गृहमंत्री पद घेऊन फडणवीस नेहमी अपयशी ठरतात का..? की संघ प्रणीत दंगल खोरांना रान मोकळे झाल्याचे प्रोत्साहन मिळते..! का नेमके ह्या ताकदी त्यांच्या स्वार्था साठी मूद्दाम आंबेडकरवादी समाजाला सॉफ्ट टारगेट करतात..? हा एक प्रश्नच म्हणावा लागेल.. त्याला कारण ही तसेच आहे ते म्हणजे पेशवाई असो वा बामनवादी हिंदूराष्ट्राचे विचार या देशात त्यांच्या या विचारधारेला विरोध करणाचे काम कायम आंबेडकरवादी समाजाने केले आहे आणी ह्यांचा हा संघर्ष नवा नसून पिढ्यांन पिढ्यांचा संघर्ष आहे..! 


२) या प्रकरणा मध्ये शंका किंवा प्रश्न उपस्थित होतील असे दूसरे कारण म्हणजे की आज पर्यंत पूर्व मराठवाड्यात आंबेडकरी समाजा सोबत जे काही असे प्रकरण, कट किंवा दंगली रचल्या गेल्या आहेत किंवा झाल्या आहेत त्यात एक कॉमन धागा म्हणजे, सध्याचे परभणी गून्हे शाखे चे पीआय. अशोक घोरबांड हा तोच पीआय आहे, जो जिथे जातो तिथे आंबेडकरवादी अस्मिते सोबत काही ना काही प्रकरण होतातच..! थोडक्यात :- पूर्णा येथे भिम जयंती वर दगडफेक झाली व तणाव निर्माण झाला तेव्हा हा पीआय तिथेच होता, त्या प्रकरणा नंतर बदली झालेला हा पीआय नांदेड़ मध्ये बोंढार हवेली गावात भिम जयंती साजरी केली म्हणून खून करण्यात आलेल्या मयत भिमसैनिक अक्षय भालेराव प्रकरणात सूद्धा ह्याच पीआय अशोक घोरबांड ला निलंबित करण्याची प्रमूख मागणी होती.. आणी आज परभणी मध्ये सूध्दा ह्याच पूर्वग्रह आणी आंबेडकरी समाजा विषय आकस असलेला पीआय ला हाताशी धरून जातीवादी नवपेशवाई सरकार परभणी तील शेकडो भिमसैनिक, भिम अनुयाई, माता-बगिनीं वर 50-50 च्या गटाने, झूंडीने खोटे गून्हे दाखल करत असून आंबेडकरवादी समाजाला अर्बन नक्षलवादी ठरवले जात आहे..? परभणी तील प्रमूख बौद्ध वसत्यां मध्ये रात्री च्या वेळी मोठ मोठ्या पोलिस व्हॅन आणून वाटेल त्याला उचलले जात आहे.. स्थानिक माहिती नूसार आता पर्यंत 400 ते 500 जणा ना अटक करण्यात आली आहे.. एक अमानुष कॉबिंग ऑपरेशन राबवले जात आहे.. 

~ उर्वरीत क्रमशः 

अशा प्रकारे आंबेडकरवादी समाजाला सॉफ्ट टारगेट बनवून कोणत्या तरी कटा साठी वापर केला गेला आहे किंवा सूड उगवण्याचा प्रयत्न झाला आहे..! असो जे काही झाले त्यात आंबेडकरी समाजाच्या तरूण पिढ्या शिक्षणा पासून वंचित करून त्यांना गून्हेगारी पार्श्वभूमी देण्यात मनुवादी राजकीय + प्रशासकीय प्रस्थापित व्यवस्था आज यशस्वी झाली आहे..!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बाबासाहेबांची रमजान ईदची इफ्तारी एक थोतांड असत्य आणी आंबेडकरवादी बौद्धांचे इस्लाम प्रेम एक धोक्याची घंटा..! वाया म्यानमार - बांग्लादेश एक धावता आढावा

The Face Of Buddhist Terror | बुद्धाचे अहिंसा तत्व व बौद्ध देशाचा आंतकवाद की अस्तित्वाची लड़ाई | Buddhism