Thangalaan Movie Review | तंगलान मूव्ही रिव्यू | आंबेडकरवादी चित्रपट तंगलान | Pa Ranjit

बाबासाहेब म्हणतात कि जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही.. बाबासाहेबांच्या याच उक्तिचा उलघडा करणारा चित्रपट म्हणजे तंगलान..! भारतीय चित्रपट क्षेत्राला काला, कबाली,सारपट्टा असे अनेक क्रांतीकारी चित्रपट देणाऱ्या पा.रंजित सरांचा हा नवा मूव्ही भारतात झालेली क्रांती प्रतिक्रांती डोळ्या समोर उभी करून.. आपले अस्तित्व विसरलेल्या लोकांना अस्तित्वाची ओळख करून देतो.. मूव्ही जरी केजीफ वर बनला असला तरी तो तूम्हाला बुद्ध काळा पर्यंत घेऊन जातो.. चित्रपटाचा नायक (हिरो) थंगलान हा नागवंशी मूलनिवासी असून त्याच्या पूर्वजांना यूध्दात हरवून अतिक्रमणकर्त्यानी या देशाच्या मूलनिवासी पिढ्यांन पिढ्यांचे कसे शोषण, अन्याय, अत्याचार करून त्यांना जल, जंगल, जमीन पासून वंचित केले, हालाखीचे जिवन जगण्यास भाग पाडले..


हा इतिहास चित्रपटातून मांडण्यात आला आहे.. पूढे जेव्हा हाजारो वर्षा नंतर जाती व्यवस्थेत खितपत पडण्या ऐवजी शौर्य दाखवून स्वाभिमान प्राप्त करण्याचा मोका थंगलान ला मिळतो, तेव्हा तो जिवाची परवा न करता आपल्या कुटूंबाच्या आणी आपल्या समाजाच्या उन्नती साठी सर्व काही करण्यास तयार होतो.. चित्रपट हा जरी सोन्याच्या लालचे ने कोलार मध्ये शोध घेणाऱ्या चोला, ब्रिटिश आणी त्याना मदत करणाऱ्या आदिवासी लोकांवर आधारित असला तरी.. वास्तव्यात त्या मागचा अर्थ आणी विचारधारा खूप व्यापक आणी सखोल आहे.. मुव्ही मध्ये जरी सोन्याचा शोध घेतला जात असेल तरी ते खरे सोने म्हणजे बुद्ध विचार आणी हि नागवंशांची भूमी आहे असे दाखवले आहे जी ला बाहेरून आलेल्या प्रत्येक अतिक्रमणकारी लोकांनी लूटून खाले आहे..


व प्रत्येक वेळी इथल्या मूलनिवासी नागवंशी लोकांनी आपल्या रक्ताच पाणी करून ह्या सोन्या सारख्या जमिनीचं रक्षण केलं आहे..! मूव्ही मधला थंगलान हा असाच एक दिशाहीन झालेला, भरकटलेला नागवंशी आहे जो त्याचा इतिहास विसरून गेला आहे.. मात्र थंगलानचा मूलगा असोका हा प्रचंड जिज्ञासू दाखवला गेला आहे.. जेव्हा भट बामनं बुद्धला शैतान म्हणून त्यांच्या पूतळ्याचे मूंडके उडवतात तेव्हा अशोका जमीनी खालून परत एकदा बुद्ध शोधून त्यावर बुद्धाचे शीर बसवतो.. थोडक्यात गाडला गेलाला बुद्ध तो परत सर्वान समोर आणतो.. भारतीय चित्रपट इतिहासात सम्राट अशोकाचा हा इतिहास लोकांन समोर असे प्रतिकात्मक पद्धतीने मांडण्याची हि पहिलीच वेळ आहे..!


थंगलान चित्रपट तूम्ही जेव्हड्या वेळा पाहाल तेव्हड्या वेळा तो तूम्ही बाबासाहेबांचे लिखान, विचार आणी बौद्ध संस्कृति सोबत रिलेट कराल.. जसे मूव्ही मध्ये एका महिलेच्या दंडावर पिंपळाच्या पाना चा टॅटो आहे.. जे बौद्ध संस्कृति चे प्रतिक दर्शवते, थंगलान च्या मूलाचे नाव अशोक आहे तर मूलीचे नाव नागम्मा आहे.. चित्रपटात थंगलानच्या तोंडी वेळो वेळी बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरीत डायलॉग्स आहेत.. जसे “एक दिन जिएंगे लेकिन सम्मान से जिएंगे” “उच्ची जात का अन्याय सहने से अच्छा हम परस्थिती को बदलने के लिए जान देदे” असे एक नव्हे तर अनेक कोस्ट आहेत.. जे बोलून थंगलान त्याच्या समाजाला क्रांती करण्यास, सज्ञान होण्यास प्रेरित करतो.. बाबासाहेब कायम सर्वाना सांगत असे की “तूमची किम्मत हि कपड्यावरून ठरत असते म्हणून कपडे रूबाबदार घाला” थंगलान सूद्धा त्याच्या समाजाला असेच विचार सांगत असतो.. या चित्रपटात एक लहान सिन आहे पण तो खूप काही सांगून जाणार आहे.. ज्यात थंगलान ने इंग्रजी कपडे घातलेले पाहून सनातनी लोक ते कपडे फाडण्याचे आदेश देतात.. तेव्हा थंगलान ते फाटलेले कपडे सूई धाग्याने वेळ मिळेल तेव्हा शिवत बसतो ते पाहून त्याची बायको गंगम्मा म्हणते कि "तू चांगले कपडे घातले तर त्यांच्या शी बरोबरी होईल म्हणून ते जळतात आपल्यावर" ही आजच्या काळात ही लागू होणारी घटना आहे ज्यामूळे या देशात फक्त चांगले कपडे घातले म्हणून आज ही एट्रोसिटी होतात.. असो चित्रपटात विलेन म्हणून जे आरती नामक पात्र दाखवण्यात आले आहे ते नागवंशी लोकांच्या मातृसत्ताक पद्धती चे आणी नागवंशी लोकांनी कशा प्रकारे बुद्ध धम्माचे रक्षण केले आहे ते उदारहरण आहे..! 


सरते शेवटी थंगलान ला सूद्धा आपल्या पूर्वजांच्या त्यागाची, बलिदानाची, शौर्याची, इतिहासाची ओळख होते.. बुद्धाला झाली सारखी त्याला ही आत्मज्ञानाची प्राप्ति होते, आपण या देशाचे गूलाम नसून या सोन्या सारख्या ज़मीनीचे मूळ मालक आहोत.. मूलनिवासी आहोत..! आणी मग तो सर्वांना सांगतो कि आपण कोण होतो आणी आज असे का झालो आहे.. (शूद्र पूर्वी कोण होते) आपण आपली ओळख, इतिहास विसरून बसलो आहे, आणी म्हणूनच आपणच आपल्या देशात गूलामी आणी लाचारीच जिवन जगतोय..! थंगलान फक्त हे सांगून थांबत नाही तर तो शपत घेतो की आता आपल्याला आपल्या जमिनीचे, जगंलाचे आणी संस्कृतिचे रक्षण करण्याची गरज आहे आणी आपण ती करणार आहोत..! मित्रांनो चित्रपटातील थंगलान ती शपत आपल्याला देतोय आणी आपल्यालाच आपल्या डोळ्यावरची झापड काढून खऱ्या इतिहासाची ओळख करून देतोय..!


भारतीय फिल्म इंडस्ट्री कायमच सिलेक्टीव राहली आहे.. श्रीमंती आणी काही मोजक्याच उच्च जातींच्या आवती भोवती फिरणारे चित्रपट आज पर्यंत आले आहेत ज्यात आपले काहीच स्थान नसते आणी असलेच तरी ते लाचार दाखवले जाते. आपला समाज प्रस्थापित नसल्यामूळे आपण आपल्याला हवे तसे चित्रपट आज पर्यंत काढू शकलो नाही.. पण आता साउथ फिल्म इंडस्ट्री मधून पा.रंजित, मारी सेल्वाराज सारखे काही आंबेडकरवादी डायरेक्ट या देशातील मूलनिवासी, बुद्ध संस्कृती, आंबेडकरवादी विचारधारा आणी जाती व्यवस्था अशा अनेक मूद्यावर सडे-तोड भाष्य करणारे चित्रपट सातत्याने आणत आहेत.. काला, कबाली, असूरण, करणन, सरपट्टा, जय भिम, मामन्ना सारखे शेकडो चित्रपट आज तूमचे आमचे अस्तित्व दाखवणारे आहेत.. अजून असे चित्रपट येत राहतील व राहवेत यासाठी गरज आहे फक्त ते चित्रपट तूम्ही थेयटर मध्ये जाऊन पाहण्याची..!


तंगलान सारखे मास्टर-पिस, अर्थपूर्ण, इतिहास आणी वास्तव्य दाखवणारे चित्रपट खूप कमी येत असतात.. त्यात ते सनातनी, प्रस्थापित समाजाचा विरोध व कपट झेलून प्रदर्शित करणे सोप्पी गोष्ट नसते.. त्या साठी प्रचंड वेळ,पैसा साम, दाम, दंड लावावा लागतो.. आणी त्यानंतर त्यांची आशा असते फक्त आपल्या समाजाच प्रबोधन व्हाव ह्याच एका उद्देश्याने असे चित्रपट येत असतात.. त्यामूळे असे चित्रपट मोबाइल मध्ये पायरेटेड बघून किंवा ओटीटी वर पाहून चित्रपट आणी डायरेक्टरचे नूकसान करण्यापेक्षा आणी 200 - 300 रूपये वर्षातून एकदा कूठल्या तरी वायफळ मूव्ही वर घालवण्या पेक्षा थंगलान सारखे चित्रपट थेयटर मध्ये जाऊनच पाहा आणी ब्लॉकबस्टर हिट करा..!

जय भिम 💙 जय संविधान

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Parbhani Violence | परभणी चे संविधान प्रकरण आणी संयम, स्व:नियंत्रण हरवलेला आंबेडकरी समाज | एक कडवट आत्मचिंतन आणी प्रशासकीय कारवाईचे परिक्षण

बाबासाहेबांची रमजान ईदची इफ्तारी एक थोतांड असत्य आणी आंबेडकरवादी बौद्धांचे इस्लाम प्रेम एक धोक्याची घंटा..! वाया म्यानमार - बांग्लादेश एक धावता आढावा

The Face Of Buddhist Terror | बुद्धाचे अहिंसा तत्व व बौद्ध देशाचा आंतकवाद की अस्तित्वाची लड़ाई | Buddhism