Parbhani Violence | परभणी चे संविधान प्रकरण आणी संयम, स्व:नियंत्रण हरवलेला आंबेडकरी समाज | एक कडवट आत्मचिंतन आणी प्रशासकीय कारवाईचे परिक्षण
★ भाग - एक :- कडवट पण सत्य, समाजाच्या कृत्याचे आत्मचिंतन 10 डिसेंबर 2024 ला परभणी मध्ये जे संविधान विटंबना प्रकरण झालं त्या नंतर संतप्त संविधान प्रेमीनी तत्काळ न्याय करत आरोपी ला चांगलाच चोप दिला आणी त्याला पोलिसांच्या हावाली सूद्धा केलं.. त्या नंतर ही दूसऱ्या दिवशी सदर घटनेचा निषेध म्हणून कडकडीत बंद केला त्या प्रतिसाद ही मिळाला मग तो शांततेत चालू असताना अचानक दूपारी उद्रेक करत जाळफोळ, दगडफेक, लोकांच्या मालमत्तेचे नूकसान करण्याचे काय कारण, काय साध्य झालं त्यातून..? आज सोशल मीडिया वर समाज माध्यमांवर समाजाची बदनामी करणारे कित्येक विडियो क्लिप्स फिरत आहेत ज्यात झेंडे घेऊन गोरगरिबांच्या मालमत्तेचे नूकसान करताना आपले तरूण दिसतायत ते विडियोस इतर समाजाची लोक रगंवून प्रदर्शित करत आहेत त्यातून समाजा चा पराक्रम किंवा रोष तर दिसत नाही उलट हूल्लड तरूण आणी अशिक्षित लोकांच प्रदर्शन दिसत आहे..! हे कितपत योग्य आहे..? एखाद प्रकरण आपण कसं हाताळाव हे कधी आपल्याला कधी कळणार..? एका समाजकंटकाची ची सजा पूर्ण समाजाला का..? महाड च्या सत्याग्रहा वेळी सूद्धा जातीवादी लोकांन कडून दगडफेक ...