Hindu Dalits Convert in Buddhism | दिल्लीत बुद्ध धम्माची दिक्षा देणारे राजेन्द्र गौतम पाल, 22 प्रतिज्ञा आणी आप भाजपाचे राजकारण | Dharmantar

                      लोकसत्ता 10-10-2022

      
    दिल्लीच्या आंबेडकर भवना मध्ये 10 हजार हिंदू लोकांनी.. हिंदू धर्म त्याग करून बुद्ध धम्म स्विकार केला.. त्या वेळी दिक्षा प्रक्रियेचा महत्वपूर्ण भाग म्हणजे बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांची शपत उपस्थित लोकांना आपच्या दिल्ली सरकार मध्ये मंत्री असणारे गौतम पाल यांनी दिली.. त्यावरून भाजप असा गदारोळ करत आहे कि देशात हे पहिल्यांदाच घडत आहे.. 1956 पासून आज पर्यंत प्रत्येक वर्षी धर्मांतराच्या कार्यक्रमात ह्या प्रतिज्ञा घेतल्याच जातात.. महाराष्ट्र सरकारच नव्हे तर भारत सरकार ने BAWS मध्ये त्या छापल्या असताना देखिल ह्यांचा इतका जळजळाट का व्हावा कळत नाही..? पंजाब मध्ये बाबासाहेबांच्या फोटो लावून क्रांति केल्याच चित्र उभं करणाऱ्या ढोंगी अरविंद केजरीवालने सूद्धा लागलीच गौतम पाल यांचा राजीनामा घेतला..!


 5 अक्टोबर 2022 रोजी दिल्लीच्या आंबेडकर भवना मध्ये झालेला धम्म दिक्षा कार्यक्रमात 10 हजार हिंदून सोबत राजरत्न आंबेडकर आणी आप चे माजी मंत्री राजेन्द्र गौतम पाल..! 

सर्व सरकारी कार्यालयात बाबासाहेबांचे फोटो लावून भावनिक राजकारण करणारे दिल्ली चे मूख्यमंत्री अरविंद के‌जरीवाल..! 

      बाबासाहेबांचे फोटो तर आता प्रत्येक चित्रपटात, देश - विदेशात लावले जातात त्यातून फक्त कृतज्ञता व्यक्त केली जावू शकते बाबासाहेबांचे कार्य नाही.. एखाद्या योजनेला, 40 शाळाना बाबासाहेबांचे नाव देणं म्हणजे त्यांचे कार्य, स्वप्न पूर्ण केल्या सारखे होत नाही.. पंजाब मध्ये 32% तर देशात निर्णायक असणाऱ्या आंबेडकरी मतांच्या जोरावर निवडणूका जिंकण्यासाठी आमच्या भावनां सोबत केजरीवाल खेळ खेळत आहे.. आप हा भाजप, कांग्रेसचाच भाऊ आहे हे काल सिद्ध झालं.. असो कोणी किती ही नाचलं तरी आमचं काही वाकडं होणार नाही.. तूम्ही आम्हाला जितकं दाबाल तितकीच मोठी उसळी घेऊन उठू.. राजीनामा देऊन गौतम पाल हतबल झाले नाहीत तर येत्या 2025 पर्यंत करोड़ों लोकांना बुद्ध धम्माची दिक्षा देण्याची शपत त्यांनी घेतली आहे.! #WaitAndWatch

भारत सरकार द्वारे छापलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे खंड 17 मध्ये असलेल्या 22 प्रतिज्ञा..!


 विविध हिंदी न्यूज चैनल वर प्रसारित कार्यक्रम 

या सर्व घटना नंतर लक्ष देण्यासारखा बाब म्हणजेच एकीकडे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सारख्या शेकडो कट्टर हिंदूत्ववादी संघटना चडीचूप असताना दलाल गोदी मिडियाच्या भावना मात्र तिव्र दूखवल्याच चित्र आहे.. ज्या प्रकारे त्यांनी हे धर्मांतराचे प्रकरण दाखवले आहे.. त्यातून हिंदू लोकांच्या मनात रोष निर्माण होऊन हिंदू - दलित दगंली उसळू शकतात.. देशात दररोज शेकडो दलित जातिवादी कृत्य घडतात हत्याकांड, बलात्कार होतात तेव्हा हे मिडिया म्हणून घेणारे दलाल भडवे कुठे असतात हा मला प्रश्न पडतो.. आमच्यावर होणारा अन्याय अत्याचार यांना का दिसत नाही.. दिसतं काय तर आमचे हक्क, अधिकार, मिळालेली समानता, आरक्षण आणी एट्रोसिटी या पलीकडे ही खूपतं ते आमचं धर्मांतर.. मूळात  आमच्या धर्मातरावर प्रश्न उपस्थित करणारे तूम्ही होताच कोण..? भारतीय संविधाना नूसार आम्ही आमचे मालक आहोत, पात्र आहोत, सज्ञान आहोत आम्ही आमचं बरं वाईट पाहून घेऊ शकतो विनाकारण त्यात कोणी ही पडू नये, मग ते सरकार असो वा मिडिया.. एखाद्या धर्माची उपासना करने, संस्कृति, भाषा, लिपि जपणे, धर्मांतर करणे हे आमचे संवैधानिक हक्क अधिकार आहेत.. ते आमचे हक्क कूठलेही बूरटे न्यूज चॅनल वाले हिरावून घेऊ शकत नाहीत.. 2018 ला हिंदूत्ववादी संघटनानी भिमाकोरेगाव ची दंगल घडवून आणली त्यांना वाटले परत कोणी शौर्य दिवस साजरा करण्यासाठी भिमा कोरेगांवात येणार नाही पण परस्थिती या उलट झाली ज्यांना भिमाकोरेगावचा इतिहास माहित नव्हता त्यांना ही हा इतिहास दगंली च्या पार्श्वभूमीवर माहित झाला आणी 2018 च्या तूलनेत 2019 नंतर 10 पट अधिक गर्दी भिमा कोरेगांवात होऊ लागली.. त्यामूळे दगंली घडवून यांना धडा शिकवू, नमवू अशा भ्रमात राहू नका.. ही बाबासाहेबांची लेकरं आहेत.. आमचा बाप जेव्हा एकटा तूम्हाला भारी पडू शकतो तर त्यांच्या विचारांची ही फौज काय काय करू शकते यांचा अंदाजच लावा.. बुद्ध धम्माची आलेली ही लाट आता या भारत भूमितून कधीच परत जाणार नाही.. हे ध्यानी, मनी रूजवण्यास सुरूवात करा..!



             ~ Datta Suryawanshi { DSCreation14 }

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Who Is Pandhurang | पंढरपुरचा बुद्ध एक षड्यंत्र | चिकित्सा खऱ्या खोट्याची - चिकित्सा बुद्ध अवतारी विठ्ठलाची | Buddha - Vitthal - Pandharpur

Ancient Buddhist Stupa Nalasopara & Ambedkar | बाबासाहेब आणी ऐतिहासिक नालासोपारा स्तूपा वरची बुद्ध जयंती | Buddha Jayanti

mystry of Gajalakshmi | बुद्धा ची आई महामाया हीच गजलक्ष्मी | Mahamaya Sculpture